esakal | बांगडा ऑन डिमांड! पावसामुळे 'इथल्या' मच्छिमारांना दिलासा...'या' दराने होतेय मासे विक्री...!
sakal

बोलून बातमी शोधा

fish.jpg

मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणारा तळवाडे साठवण तलाव ओव्हरफ्लो आहे. तलावात 85 दशलक्ष जलसाठा आहे. मुबलक पाण्यामुळे तलावात भरपूर मासे आहेत. परिसरातील काही जण मासे पकडून रोजगार मिळवित आहेत.

बांगडा ऑन डिमांड! पावसामुळे 'इथल्या' मच्छिमारांना दिलासा...'या' दराने होतेय मासे विक्री...!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) तालुक्‍यासह कसमादे परिसरात यंदा सव्वा महिन्यातच बहुतांशी जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने स्थानिक मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. बांगडा व इतर गावठी मासे पकडून परिसरातच या दरात किलोने विक्री केली जात आहे.

मासेमारी करण्यात आदिवासी पारंगत

गेल्या वर्षीही चांगल्या पावसामुळे जलसाठे तुडुंब होते. त्यामुळे स्थानिक मासेमारी करणाऱ्यांना वर्षभर रोजगार मिळत होता. मोठे धरण व प्रकल्पातील जलसाठ्यात मासेमारीचा ठेका दिला जातो. मात्र नद्या, गावपातळीवरचे तलाव, पाझर तलाव, साठवण बंधारे, नाले आदींमधील मासे पकडण्याचे काम स्थानिकच करतात. जाळे लावून फुग्याच्या मदतीने मासेमारी करण्यात या भागातील आदिवासीबांधव पारंगत आहेत. कसमादे परिसरात लहान-मोठी गावतळी, तलाव, नदी, नाल्यांमध्ये मासे पकडणारे आदिवासी बांधवांना यामुळे चांगला व्यवसाय उपलब्ध झाला आहे. काहीजण काठीला गळ बांधून मासे पकडतात. दिवसभरात दोन-तीन किलो मासे मिळाले तरी रोजगार सुटतो. बांगडा व इतर गावठी मासे पकडून परिसरातच 100 ते 120 रुपये किलोने विक्री केली जात आहे.

तळवाडे साठवण तलाव ओव्हरफ्लो

यंदा तालुक्‍यासह कसमादेत महिन्यातच सरासरीच्या निम्म्याच्या आसपास पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण, तलाव व साठवण बंधाऱ्यांमध्ये 25 ते 30 टक्के जलसाठा आहे. चणकापूर धरणातून नुकत्याच सोडलेल्या आवर्तनामुळे विविध पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरले आहेत. मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणारा तळवाडे साठवण तलाव ओव्हरफ्लो आहे. तलावात 85 दशलक्ष जलसाठा आहे. मुबलक पाण्यामुळे तलावात भरपूर मासे आहेत. परिसरातील काही जण मासे पकडून रोजगार मिळवित आहेत.

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!

माशांची होतेय हातोहात विक्री

तालुक्‍यातील बारा गाव योजनेचा तलाव व माळमाथ्यावरील दहीकुटे धरण ओव्हरफ्लो आहे. शिवाय गावपातळीवरच्या तलावांमध्ये जलसाठा वाढला आहे. त्यामुळे शेकडो जणांना रोजगार मिळाला आहे. इतर माशांच्या तुलनेने कमी किंमत असल्याने गावठी मासे ग्रामीण भागात चवीने खाल्ले जात आहेत. विशेष म्हणजे माशांची हातोहात विक्री होत आहे.  

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

loading image
go to top