Satpur Extortion Case : भाजप महिला नगरसेवक पुत्र नागरेवर वर्षभरात तिसरा हल्ला

Satpur Extortion case
Satpur Extortion caseesakal

नाशिक : भाजपचे महीला नगरसेवक पूत्र व भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस तथा ठेकेदार विक्रम नागरे यांना वेळोवेळी धमकी देऊन सराईत गुन्हेगारांनी १० लाख रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी नागरे याच्यावर आतापर्यंत तीन वेळा जिवे ठार मारण्याचा प्रकार समोर आले असून या घटनेच कारण काय या बाबत ही गुन्हे शाखाकडून चौकशी करण्याची मागणी संशयिताच्या नातेवाइकांनी केली असल्याचे तपास यंत्रणाने सांगितले. (Satpur Extortion Case Third attack on BJP women corporator son Nagre in year Nashik Crime News)

मागील महिन्यात नवरात्रीत नागरे यांच्याकडून एका सराईताने ५० हजाराची खंडणी व मोबाईल उकळण्यात आल्याप्रकरणाचा गुन्हा सातपूर पोलिस ठाण्यात दाखल आहे. एकाच व्यक्तीकडे आणि तेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार खंडणी उकळत असल्यामागील गौडबंगालामुळे पोलिस यंत्रणाही चक्रावली आहे. मागील महिन्यात सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात राहणाऱ्या अक्षय युवराज पाटील या सराईताने नागरे त्यांच्याकडून मोबाईल उकळला होता.

इतकेच नव्हे संबंधिताने बुलेट गाडी, ५० हजार रुपये व आय फोनचीही मागणी केली होती. नेहमीच्या धमक्यांमुळे नागरे यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अक्षय पाटील याच्याविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. सध्या तो मध्यवर्ती कारागृहात आहे.

Satpur Extortion case
Nashik : होळकर, रामवाडी पुलाची दैना; दुरवस्थेमुळे गंभीर दुर्घटना होण्याचा धोका

पोलिसांकडून चौकशी

गेल्या महिन्यात याच भाजपचे बाहुबली समजल्या जाणाऱ्या तसेच भाजपच्या माजी मंत्री, यांच्यासह नेते मंडळींच्या निकटवर्तीय मानले जाणारे नागरे यांना थेट धमकावण्याचा प्रकार उघडकीस आल्याने पक्षाच्या नेतेमंडळीस कार्यकर्त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. संशयित व फिर्यादी यांचे काही संबंध होते का? याची खातरजमा आज दिवसभर पोलिस करताना बघावयास मिळाले.

"खंडणीच्या प्रकरणात सिसीटीव्ही फुटेज व इतर महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.तसेच संशयिताच्या शोधासाठी विशेष पथक तयार करून मुंबई सह इतर राज्यांत रवाना केले आहेत, लवकरच सर्व संशयित ताब्यात येतील." - महेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Satpur Extortion case
Nashik Crime News : वॉचमनने केला बांधकाम मजुराचा खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com