सातपूर: उद्योगांच्या विस्तारासाठी अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढे उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी भागात सर्वाधिक गुंतवणूक होणार असून, त्यासाठी तेथे होऊ शकणाऱ्या किमान १५ उद्योगांसाठीचे नवे धोरण बदलांच्या प्रक्रियेत आहे. नंदुरबार, नवापूरसह घोटी, इगतपुरी आणि विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा त्यात समावेश असल्याचे उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. उद्योगांना वीजपुरवठ्याची अडचण भासू नये, यासाठी उद्योगांसाठी वीजपुरवठ्याचे जाळे उभारण्यात येणार आहे.