Leopard Attack
sakal
नाशिक/सातपूर: आठ- दहा दिवसांपासून बाहेरच्या परिसरात फिरणारा बिबट्या शुक्रवारी (ता. १४) दुपारी साडेतीनच्या सुमारास थेट शहराच्या दाट लोकवस्ती असलेल्या कामगारनगरात शिरला आणि क्षणातच परिसरात भीतीची लाट पसरली. एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात, तर एका इमारतीच्या छतावरून पुढच्या इमारतीत अशा चपळाईने उड्या मारत बिबट्याने अक्षरशः कहर माजविला.