सातपूर-नाशिक- केंद्र सरकारने अर्थसंकल्पात किमान नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. १८) सातपूरच्या आयटीआय सिग्नलजवळील पीएफ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. कार्यालयाला ‘टाळा ठोका’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष व ‘आयटक’चे राज्य सचिव राजू देसले यांनी दिली.