SBI, महावितरण कंपनीला नाशिक महापालिकेकडून दंडाच्या नोटिसा

नाशिक महापालिका प्रशासन सध्या स्वच्छतेच्या मुद्द्यावर ॲक्‍शन मोडवर आली आहे.
Nashik Municipal Corporation Fund
Nashik Municipal Corporation Fund esakal

नाशिक : महापालिका प्रशासन सध्या स्वच्छतेच्या मुद्द्यावर ॲक्‍शन मोडवर आली आहे. रस्त्यावर बांधकामाचा मलबा टाकला म्हणून स्टेट बँकेच्या एनडी पटेल मार्गावरील शाखेला स्वच्छता विभागाने नोटीस बजावली. तसेच, महापालिकेने प्रथमच महावितरण कंपनीला फांद्या रस्त्यावर फेकल्याबद्दल ५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.

एनडी पटेल मार्गावर स्टेट बँकेच्या कर्ज वितरण विभागाचे मुख्यालय आहे. तेथील शाखेने अंर्तगत कामानंतर रस्त्यावर बांधकामाचे साहित्य फेकल्याचे लक्षात आल्यावर गुरुवारी (ता. २३) महापालिका आरोग्य विभाग तसेच पूर्व विभागाच्या पथकाने स्टेट बँकेला अडीच हजार रुपये दंडाची नोटीस बजावली. काही दिवसांपासून शहरात अस्वच्छताविरोधात महापालिकेने मोहीम उघडली आहे. आयुक्त रमेश पवार यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेउन ब्लॅक स्पॉट कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, वाहनावरून येता- जाता रस्त्याच्या कडेला कचरा फेकून पुढे जाणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांसह विभागीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा पहाटे वेगवेगळ्या भागाला दौरा करण्याच्या सूचना आहेत.

Nashik Municipal Corporation Fund
जिथे तुम्ही, तिथे आम्ही : दादा भुसे अखेर एकनाथ शिंदे गटात सामील

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महावितरण कंपनीतर्फे शहरभर विजेच्या तारांना घासणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. दरवर्षी नित्यनेमाने होणाऱ्या या मोहिमेत महावितरण कंपनीकडून खासगी ठेकेदारांना काम दिले जाते. मात्र, संबंधित ठेकेदारांकडून फांद्या तोडल्यानंतर तोडलेल्या फांद्या आहे त्या जागेवर टाकल्या जातात. कायमस्वरूपी होणाऱ्या या गैरसोयीविषयी अनेक नागरिकांनी महावितरण कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. दरवर्षी नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात, मात्र महावितरणकडून दखल घेतली जात नाही. मात्र, या वेळी महापालिकेने महावितरण कंपनीला फांद्या रस्त्यावर फेकल्याबद्दल ५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.

Nashik Municipal Corporation Fund
निवडणूक तयारी सोडून शिंदे मागे कोण जाणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com