Crime Alert : शाळा गजबजताच टवाळखोरी वाढली; पोलिसांची गस्त वाढण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Youth roaming around the school premises for no reason

Crime Alert : शाळा गजबजताच टवाळखोरी वाढली; पोलिसांची गस्त वाढण्याची मागणी

पंचवटी (जि. नाशिक) : दिवाळीच्या सुटी संपल्यानंतर शाळा गजबजताच मखमलाबाद गावातील शाळेच्या परिसरात टवाळखोरी वाढली असून पोलिसांकडून शाळा सुरू होण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर परिसरात टवाळखोर पुन्हा सक्रिय झाले असल्याचे चित्र बघायला मिळते असते. (school gets crowded vandalism increases Demand for increased police patrol Nashik Crime Alert News)

मखमलाबाद शाळेच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे. त्यातच नाशिक महापालिकेच्या संरक्षण भिंती लगत कोळीवाडा परिसर आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच नाशिक महापालिकेची शाळा सुरू झाल्याने या भागात परिसरातील टवाळखोर पुन्हा शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात फिरायला लागले आहेत. पाच- सहा जणांच्या टोळक्याने फिरताना दिसत असतात.

तर, महापालिकेच्या शाळेतील आवारात ठाण मांडून बसलेले असतात. दरम्यान, एखाद्या वेळेस पोलिसांची गाडी दिसताच पळून जातात. गाडी जाताच पुन्हा शाळांच्या आवारात बसलेले असतात. मनपा शाळेच्या आवारात ठाण मांडणाऱ्या काही युवकांकडून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनादेखील त्रास दिला जात असल्याचे चित्र बघायला मिळते.

हेही वाचा: Hair Transplant Failure : केस प्रत्यारोपण फेल का होते?; जाणुन घ्या

त्यामुळे शाळेच्या आवारात बसणाऱ्या टवाळखोरांवर जरब बसणे गरजेचे आहे. शाळेत शिकवणारे शिक्षक बाहेरून येत असल्याने तेही तक्रार करायला धजावत नाही. त्यामुळे बाहेरील युवकांचे फावते आहे. गावातील सुज्ञ नागरिकांनीदेखील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे .

बीट मार्शलने मारावा राउंड

शाळा भरण्याच्या वेळी साधारण १० ते ११. ३० वाजेच्या दरम्यान तसेच शाळा सुटण्याच्या वेळ ही मुख्य आहे. या वेळी या भागात गस्त घालणारे बीट मार्शल पोलिसांनी राउंड मारायला हवा. यापूर्वी सदर प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे यांनी दखल घेत कारवाई केली होती. पुन्हा एकदा पोलिसांनी सक्रिय होत या टवाळखोरीचा बीमोड करण्यासाठी वेळ आली आहे.

हेही वाचा: Heavy Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे येवल्यात 9 हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट!