Science on Wheels
sakal
नाशिक: आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड रुजावी, यादृष्टीने ‘सायन्स ऑन व्हील्स’ या अभिनव उपक्रमाद्वारे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांमधील निरीक्षणशक्ती, प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असून, नुकताच त्र्यंबकेश्वर येथील भिलमाळ आश्रमशाळेत या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला.