Nashik News : भाविकाचा पैशांचा बटवा शोधून केला परत; सप्तशृंग गडावरील सुरक्षारक्षकांचा प्रामाणिकपणा

Security guards Chetan Thakur and Sunil Chavan while finding the wallet of a woman devotee at Kalyan and returning it to her.
Security guards Chetan Thakur and Sunil Chavan while finding the wallet of a woman devotee at Kalyan and returning it to her. esakal

Nashik News : सप्तशृंग गडावरील गुरुबक्सानी फनिक्युलर ट्रॉली रोपवेचे सुरक्षारक्षक चेतन ठाकूर (बाऊन्सर) यांनी महिला भाविकाचा हरवलेला पैशांचा बटवा सहकारी सुनील चव्हाण यांच्या मदतीने शोधून प्रामाणिकपणे परत केला. त्याबद्दल श्री. ठाकूर यांचे कौतुक होत आहे. (security guards found wallet of devotees at Saptashrungi Fort and returned it nashik news)

सध्या शाळांना उन्हाळी सुट्या असल्याने गडावर भाविकांची गर्दी होत आहे. त्यात रविवारी (ता. १४) भाविकांची नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. कल्याण येथील विठाबाई रघुनाथ सांगोळे (वय ६०) ह्या कुटुंबियांसह गडावर आल्या होत्या. रोप वेद्वारे मंदीरात जात असताना त्याचा पैशाचा बटवा ट्रॉलीत बसताना किंवा उतरताना गहाळ झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक चेतन ठाकूर यांना याबाबत माहिती दिली.

ठाकूर व त्यांचे सहकारी सुरक्षा रक्षक श्री. चव्हाण यांनी सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात फुटेज तपासले असता, घाईगर्दीत पायऱ्या चढत असताना त्यांचा बटवा खाली पडल्याचे व ते एका महिलेने उचलल्याचे दिसले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Security guards Chetan Thakur and Sunil Chavan while finding the wallet of a woman devotee at Kalyan and returning it to her.
Water Scheme : लासलगावसह 16 गावांच्या पाणीयोजनेसाठी नियंत्रण समिती

त्यावर संबंधीत महिलेचे फुटेज मोबाईलमध्ये घेवून ठाकूर व चव्हाण यांनी रोपवे परिसरात या महिलेचा शोध घेतला. त्या भेटल्यावर विचारणा केली असता, सदर महिलेने पैशांचा बटवा सुरक्षा रक्षकांच्या स्वाधीन केला.

त्यानंतर श्रीमती सांगोळे यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार शहानिशा करुन त्यांना ते परत करण्यात आले. सांगोळे यांनी त्यांचे आभार मानत बक्षीस देवू केले, मात्र दोघांनीही नम्रपणे नकार देत, गर्दीच्या ठिकाणी दागिने, पैसे सांभाळण्याबाबत सूचना केल्या. रोप वेचे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा, कार्यालयीन व्यवस्थापक सोपान कोनमंडले आदींसह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोघांचे कौतुक केले आहे.

Security guards Chetan Thakur and Sunil Chavan while finding the wallet of a woman devotee at Kalyan and returning it to her.
Trimbakeshwar Controversy : त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न कोणी केला अन् त्यांना का रोखलं गेलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com