
नाशिक : राज्यातील एक कोटी 40 लाख 11 हजार हेक्टरवर यंदाच्या खरिपाच्या पेरण्या अपेक्षित आहेत. त्यासाठी 17 लाख 27 हजार क्विंटल बियाणे, 40 लाख टन खतांची आवश्यकता भासणार आहे. सध्याच्या लॉकडाउनमध्ये हंगामाची गैरसोय होऊ नये आणि खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बांधापर्यंत बियाणे, खते, कीटकनाशके पुरविण्याचे आदेश कृषिमंत्री दादा भुसेंनी दिले. त्यानुसार आतापर्यंत इतकी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणी-खते पोचविण्यात आली आहेत.
उपक्रमाला वेग द्यावा लागणार
शेतकऱ्यांच्या मागणीचे अर्ज गुगलशी लिंक करण्यात आले आहेत. त्याद्वारे आलेली मागणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला कळविली जाते. खरेदीचा संपूर्ण व्यवहार शेतकऱ्यांचे गटप्रमुख यांच्यामार्फत केला जात आहे. आर्थिक व्यवहारामध्ये कृषी विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग टाळण्यात आला आहे. वाद, तक्रारी होऊन उपक्रमाला गालबोट लागू नये ही भूमिका त्यामागील आहे. राज्यात गेल्या चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत 21 हजार 212 टन खते, 11 हजार 880 क्विंटल बियाणे पोचविण्यात आले आहे. त्यासाठी आठ हजार 281 शेतकरी गट कार्यरत करण्यात आले आहेत. आतापर्यंत 52 हजार 455 शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणी-खते पोचविण्यात आली आहेत. ठाणे, अमरावती, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणे अथवा खते पोचलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या मागणीचा अभाव त्यामागे असला, तरीही कृषी यंत्रणेला प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचवून उपक्रमाला वेग द्यावा लागणार आहे. अन्यथा पाऊस झाला आणि पेरणीलायक जमीन होऊ लागताच, खरेदीसाठी झुंबड उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जालना जिल्ह्यात दोन हजार 400, अकोल्यात एक हजार 355, यवतमाळमध्ये 32 अशी एकूण तीन हजार 787 कापूस बियाणे पाकिटे शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात आली आहेत.
नाशिकमध्ये हजाराहून अधिक टन खते पोच
नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील एक हजार 96 गावांमध्ये शेतकऱ्यांची गटसंख्या एक हजार 882 इतकी आहे. त्यामध्ये 62 हजार 905 शेतकरी समाविष्ट आहेत. शेतकऱ्यांना 38 हजार 794 क्विंटल बियाणे आणि 41 हजार 881 टन खतांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत 390 क्विंटल बियाणे आणि एक हजार 143 टन खते पोच झाली आहेत. पोच झालेले बियाणे क्विंटलमध्ये ः सोयाबीन- 271, भात- 44, मका- 73, इतर- 3. तसेच खते टनामध्ये याप्रमाणे ः यूरिया- 439, डीएपी- 166, एसएसपी- 44.65, इतर- 493.
बांधावरील बियाणे-खतांच्या पुरवठ्याची स्थिती
विभागाचे नाव, कार्यरत शेतकरी गट, खते टनामध्ये, बियाणे क्विंटलमध्ये, शेतकरी संख्या
ठाणे 104, 76.04, 141.9, 1 हजार 230
कोल्हापूर 505, 1030.735, 365, 5 हजार 14
नाशिक 178, 867.115, 362.29, 2 हजार 39
पुणे 3832, 3949.21, 1397.35, 2 हजार 651
औरंगाबाद 969, 7206.18, 1649.49, 16 हजार 214
लातूर 494, 2694.2, 1588.5, 5 हजार 35
अमरावती 1215, 4713.8, 6266.88, 18 हजार 802
नागपूर 984, 674.94, 109.18, 1 हजार 470
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.