Nashik News: केंद्र सरकारच्या स्वच्छता पोर्टलवर गोंडेगावची निवड! नाशिक जिल्ह्यातून 3 गावांची निवड जाहीर

Villagers
Villagersesakal

Nashik News : राज्य शासनाने ग्रामीण क्षेत्रातील सर्वसामान्य माणसांचा विकास होण्यासाठी ग्रामपालिकांवर जबाबदारी टाकली आहे. गावाचा शैक्षणिक, सांस्कृतिक , सामाजिक विकासाबरोबरच स्वच्छता तसेच आरोग्य विषयक नागरिकांमध्ये जागृती व्हावी.

देशाच्या प्रत्येक नागरिकाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर टाकली आहे. त्यासाठी मोठया प्रमानात आर्थिक अनुदान विविध योजनांच्या माध्यमातून दिले जाते. देशातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हीलेज व्हावे.

यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण केले जाते.महाराष्ट्र राज्यातून या अभियानामध्ये नाशिक जिल्ह्यातील ३ ग्रामपंचायतिंची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली . दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव ग्रामपंचायतिचा या निवडीत समावेश केला गेला आहे. (Selection of Gondegaon on Central Governments Cleanliness Portal Selection of 3 villages announced from Nashik district)

महाराष्ट्र शासनाने सम्पूर्ण राज्यात स्वच्छ गाव सुंदर गाव, स्मार्ट गाव, निर्मलग्राम अशा विविध योजनेमार्फत समृद्ध ग्रामविकासाला गती दिली आहे . त्यात ग्रामपंचायत विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकासाच्या कार्याचे तटस्थपणे मूल्यमापन होऊन जिल्हा , राज्य आणि शेवटी केंद्रीय स्तरावर निवड केली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छगाव या मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातून ३ ग्रामपालिकांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.

या निवड यादीत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव या गावाची निवड नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत समावेश आहे. आठ दिवसांपूर्वी राज्यस्तरीय परीक्षण समितीने गावाला भेट देऊन पाहणी केली होती.

स्वच्छता अभियान ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत राज्यस्तरावर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या तपासणी पथकाने नाशिक जिल्ह्याला नुकतीच भेट दिली. त्या भेटीमध्ये त्यांनी जिल्हा स्तरावरील निवड झालेल्या गावांची प्रत्यक्ष पाहणी केली.

जिल्हास्तरावरील निवड यादीत प्रथम क्रमांक पटकवलेल्या गोंडेगाव ( दिंडोरी )या गावाची पाहणी करून पाहणी केली. त्या पाहणीमध्ये गावाच्या स्वच्छतेचा दर्जा, सार्वजनिक शौचालयाचा वापर, वैयक्तिक शौचालयाचा वापर, घनकचरा व्यवस्थापनाचे काम, आरोग्याचे महत्त्व, ग्रामपंचायतीचे डिजिटलीकरण, शाळा व अंगणवाडी यांचा विकास, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प या आणि इतरही बाबींची काटेकोरपणे पाहणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Villagers
NMC Recruitment: महापालिकेची भरती प्रक्रिया रखडली; बेरोजगारांचे भरतीकडे डोळे

ग्रामपंचायत कामकाजाबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले .राज्यस्तरावर सादर केलेल्या अहवालात त्यांनी गोंडेगावाची उत्कृष्ट गाव म्हणून निवड केली. आता गोंडेगाव हे स्वच्छता अभियानामध्ये देश पातळीवर महाराष्ट्रातील निवड करण्यात येणाऱ्या गावांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे.

ही बातमी गावात येऊन धडकताच गावात नागरिकांनी आंनद व्यक्त केला.या उत्कृष्ट कार्याचे सारे श्रेय ग्रामस्थांनी उच्च विद्या विभूषित सरपंच सौ लक्ष्मीताई भास्करराव भगरे उपसरपंच सौ शमीम पठाण, सदस्य संगीता भवर, रूपाली गांगुर्डे, पल्लवी भगरे, अजय गांगुर्डे, अनिल भगरे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक नईम सय्यद सौ पाटीललआणि बचत गटाच्या महिला ग्रामस्थ यांना हे श्रेय दिले.

राज्यस्तरावर ग्रामपंचायत ने मिळविलेल्या यशाबद्दल विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कादवा सह.साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय पाटील, नाशिक जि. परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे, शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे आदींनी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले .

गोंडेगाव ग्रामपालिकेने यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार, पर्यावरण रत्न पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत तालुकास्तरावर प्रथम, जिल्हास्तरावर तीन वेळा पुरस्कार मिळवला, तसेच नाशिक विभागामध्ये पाणी व गुणवत्ता संदर्भात विशेष पुरस्कार प्राप्त केला आहे.

त्याचप्रमाणे आर आर पाटील सुंदर गाव योजना, स्मार्ट ग्राम योजना अशा विविध पुरस्कारांनी गोंडेगाव ग्रामपालिका यापूर्वीही सन्मानित केली आहे

"हे यश आमच्या संपूर्ण गावाचे आहे या यशात मी निमित्त मात्र आहे कारण सर्व ग्रामस्थांनी काटेकोरपणे स्वतःच्या स्वच्छतेच्या संदर्भात काम करत आहे ज्याच्या योजना गावात राबविण्यात आल्या त्या योजनांसाठी ग्रामस्थांनी भरीव सहकार्य केले माझे सर्व सहकारी सदस्य त्याचप्रमाणे या ग्राम विकासाच्या कामात जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीमा मित्तल उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील गटविकास अधिकारी नम्रता जगताप तसेच विस्तार अधिकारी स्वच्छता अभियान चे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले."

- सौ.लक्ष्मीताई भगरे सरपंच, गोंडेगाव (दिंडोरी)

Villagers
National Level Conference: राष्ट्रीय परिषदेसाठी प्रा. ईश्वर बाठे यांची निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com