सिन्नर- राज्य शासनाने लागू केलेली मुख्यालयात येऊन सेल्फीसह हजेरी ही बाब आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी केवळ अशक्य आहे, असा दावा करीत शासनाने आधी कामाच्या वेळा निश्चित कराव्यात, तसेच सेल्फीसाठी आवश्यक सुविधा द्याव्यात, आमचा सेल्फीसह हजेरीला विरोध नाही, असे निवेदन सिन्नर तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध संवर्गांच्या संघटनांतर्फे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांना देण्यात आले. सेल्फीसह हजेरी यासह विविध प्रश्नांचा त्यात समावेश आहे.