ZP News : पुढील महिन्यापासून आरोग्य कर्मचाऱ्यांची सेल्फी हजेरी

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
ZP CEO Ashima Mittal, Nashik Newsesakal

ZP Health Workers News : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी नाशिक महापालिकेच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांची सेल्फी हजेरी सुरू केली जाणार आहे.

यासाठी असलेली यंत्रणा अंतिम टप्यांत असून पुढील महिन्यापासून ही हजेरी सुरू होणार असल्याची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (Selfie attendance of health workers from next month nashik news)

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी सोमवारी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी यांची बैठक मंगळवारी (ता. १८) मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांच्या उपस्थितीत झाली. श्रीमती मित्तल आणि डॉ. मोरे यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी १५ तालुक्यांमधील वैद्यकीय स्थितीची मांडणी अधिकाऱ्यांनी करत अडचणी मांडल्या. देशभरात एकीकडे जीवनशैलीजन्य आजारांचा आलेख वेगाने वाढत असून दुसरीकडे सन २०११ च्या जनगणनेनुसार तब्बल ६१ लाख लोकसंख्या असणाऱ्या नाशिक जिल्ह्यात जीवनशैलीजन्य आजारांचे आरोग्य केंद्रांमधील दवाखान्यांमधील स्क्रिनींग अवघे ५ हजारांच्या घरात नोंदविले आहे.

ही धक्कादायक बाब बैठकीत उघड झाली. यावर, श्रीमती मित्तल यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्या कामाबाबत तीव्र असमाधान व्यक्त करून जीवनशैलीजन्य आजारांच्या रुग्णांच्या स्क्रिनींग वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात मधुमेह, रक्तदाब आणि रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने जीवनशैलीजन्य आजारांना मोठी लोकसंख्या बळी पडते आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
Nashik ZP News: जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्यांचे प्रश्नांवर देणार भर; डॉ. सुधाकर मोरे यांनी स्वीकारला पदभार

बहुतांश लोक खासगी दवाखान्याकडे वळत असले तरीही इतर आजारांसाठी शासकीय दवाखान्यांचा लाभ घेणाऱ्या ३० पेक्षा अधिक वयोगटातील सर्वच रुग्णांचे स्क्रिनींग आरोग्य केंद्रासह उपविभागीय रूग्णालयांकडून अपेक्षित प्रमाणात होत नसल्याचे निरीक्षण सीईओ मित्तल यांनी नोंदविले.

गेल्या काही महिन्यात जिल्ह्यातून या आजारांचे अवघे पाच हजार रूग्ण समोर आले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात हे स्क्रिनींग वाढवा अन् नंतरच बैठकीला या, अशी ताकीदही यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली.

परिचारिकांच्या प्रश्नांसाठी ‘एक महिन्याची मुदत’

आरोग्य यंत्रणेंतर्गत काम करणाऱ्या परिचारिकांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. परिचारिकांच्या कामाच्या वेळा, थकीत असणारे मानधन, कर्तव्यासाठी साधनांची उपलब्धता असे विविध प्रश्न समन्वयाने मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन देतानाच यासाठी आरोग्य विभागास प्रशासनाने एक महिन्याची मदत दिली आहे. यात सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश श्रीमती मित्तल यांनी यावेळी दिले.

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
Nashik Aditya Thackeray : आदित्य ठाकरे 22 पासून जिल्हा दौऱ्यावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com