esakal | नाशिकच्या माजी महापौरपुत्राकडून एकास बेदम मारहाण; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

नाशिकच्या माजी महापौरपुत्राकडून एकास बेदम मारहाण; गुन्हा दाखल

sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : गणपती स्टॉल्स चालकांकडून पैसे मागतो, अशी कुरापत काढून शिवीगाळ करीत संशयित विशाल अशोक मुर्तडक (रा. मखमलाबाद नाक्याजवळ, पंचवटी) याने हेमंत किसन आहेर (वय ३१, रा. शिंदेनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) यास बेदम मारहाण केली. पंचवटी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

यातील संशयित विशाल हा माजी महापौर तथा मनसेचे ज्येष्ठ नेते अशोक मुर्तडक यांचा मुलगा असून, फिर्यादी व संशयित हे नातेवाईकही आहेत. रविवारी (ता. ५) रात्री मखमलाबाद नाका येथील उदय आर्ट दुकानाजवळ संशयित विशालने हेमंतला थांबवून ‘तू मखमलाबाद नाका येथील गणपती स्टॉलवाल्यांकडून पैसे मागतो,’ असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. जमिनीवरील फरशीच्या तुकड्याने फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्या वर डोक्यावर मारून दुखापत केली.

हेही वाचा: मालेगावात मित्रपक्षांत ठिणगी; शिवसेनेची कॉंग्रेस कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

हेही वाचा: नाशिक : सापळा रचत पकडले 3500 किलो गोमांस

loading image
go to top