esakal | नाशिक : सापळा रचत पकडले 3500 किलो गोमांस
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

नाशिक : सापळा रचत पकडले 3500 किलो गोमांस

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : मालेगावहून मुंबईच्या दिशेने गोमांसाने भरलेला ट्रक जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी सापळा रचत मुंबई- आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर ट्रक पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.

बजरंग दलाचे कार्यकर्ते पुरुषोत्तम आव्हाड, चंदन भास्करे, तेजस नेहरकर, अनिकेत कुमावत, आशिष सिंग, नंदेश ढोले, संदेश धात्रक यांना मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.६) रात्री मालेगाव येथून मुंबईच्या दिशेने निघालेला गोमांसाचा ट्रक नाशिक येथे दाखल होत आहे. कार्यकर्त्यांनी (एमएच- ४१- एयू- १९०२) ट्रक अडवून अंबड पोलिसांना घटनेची माहिती दिली.

हेही वाचा: निफाडला आगीचे तांडव! नऊ दुकाने भस्मसात

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येत सदर ट्रक ताब्यात घेतला. मजीद खान शहीद खान (२६), शेख जावेद, शेख दाऊद, शेख फिरोज शेख रहेमान (३४ सर्व रा. मालेगाव) यांना ताब्यात घेऊन ट्रकमधील ३ हजार ५०० किलोचे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे गोमांस, तसेच ट्रक अंबड पोलिसांनी जमा केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे करीत आहे. ट्रकच्या पुढील भागात (एमएच- ४१- एयू- १९०२) या क्रमांकाची नंबर प्लेट लावली आहे, तर त्याच्या मागील बाजूस (एमएच- १२- जीटी- ७०००) या क्रमांकाची दुसरी नंबर प्लेटदेखील लावली आहे. असे असताना फिर्यादीत एमएच- १४- एयू- १९०२ या नंबरचा उल्लेख केल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण होत आहे.

हेही वाचा: नाशिक : खासगी कंपनीविरोधात रुग्णवाहिका चालकांचा बेमुदत बंद

loading image
go to top