Nashik Crime News : शहरात दुचाक्या चोरट्यांचा ‘सिलसिला’ सुरूच

दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळच घातला असून, शहरातून पुन्हा सहा दुचाक्या चोरीला गेल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
crime
crimeesakal

Nashik Crime News : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळच घातला असून, शहरातून पुन्हा सहा दुचाक्या चोरीला गेल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

रमेश अर्जून पाडवी (रा. राजदीप सोसायटी, अश्वमेधनगर, पंचवटी) यांची १५ हजारांची दुचाकी (एमएच १५ एफबी २७४४) गेल्या शुक्रवारी (ता. ९) मध्यरात्री चोरीला गेली आहे. (series of two wheeler thieves continues in nashik city Six two wheeled stolen worth about one and half lakhs news)

विजयसिंग खंडूसिंग सूर्यवंशी ( रा. राधाकृष्णनगर, अशोकनगर, सातपूर) यांची १० हजारांची दुचाकी (एमएच १५ एआर ९०८३) गेल्या शनिवारी (ता. १०) आशादिप मंगल कार्यालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद चंद्रभान बोराडे (रा. पाटोदा, ता. येवला) यांची ४० हजारांची पल्सर दुचाकी (एमएच १५ एचडी ५९१४) गेल्या ६ तारखेला मध्यरात्री कोणार्कनगर परिसरातील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम किशोर देवरे (रा. पाथर्डी फाटा, इंदिरानगर) यांची ५५ हजारांची पल्सर दुचाकी (एमएच ४१ एएक्स ३१०७) गेल्या शुक्रवारी (ता.९) त्र्यंबकरोडवरील भाविन व्हिल्सच्या पार्किंगमधून चोरीला गेली.

crime
Nagpur Crime: नागपुर हादरले! चोवीस तासांत तीन खून, उधारीच्या पैशाच्या वाद आणि क्षुल्लक भांडणातून युवकांचा खून

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश अरुण सोनवणे (रा. शिवाजीनगर, सातपूर) यांची ३० हजारांची पल्सर दुचाकी ( एमएच १९ डीक्यु ७६१८) गेल्या ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री गोपाल कॉम्प्लेक्स येथून चोरीला गेली.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सुकदेव मोरे (रा. मुरारीनगर, अंबड) यांची १५ हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच ४१ एसी १६०८) गेल्या २२ जानेवारी रोजी मध्यरात्री राहत्या अक्षय रो हाऊस येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Akola Crime: बसमधून रोख रक्कमेसह १३.३३ लाखांचे दागिने लंपास! ३ तरुणांनी अशी केली चोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com