Nashik News: गंभीर तक्रारींची राज्य शासनाकडून दखल; महापालिकेकडे मागितला स्वयंस्पष्टता अहवाल

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

Nashik News : महापालिकेशी संबंधित तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने थेट राज्य शासनाकडे तक्रारी जात असल्याने ३२ गंभीर तक्रारींची दखल घेत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने बारा विभागांकडे कारवाई संदर्भात महापालिकेकडे स्वयंस्पष्टता अहवाल मागितला आहे. (Serious complaints taken into consideration by state government self clarification report sought from NMC Nashik News)

महापालिकेत गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. या कालावधीत आयुक्त प्रशासकीय कारभार सांभाळतात. दीड वर्षात महापालिकेला चार आयुक्त मिळाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात ढिसाळपणा आला आहे.

यादरम्यान प्रशासनावर नियंत्रण नसल्याने तक्रारींचा ओघ वाढला आहे. महापालिकेच्या संदर्भात तक्रारी करण्यासाठी एनएमसी ई- कनेक्ट ॲप असून, यावर दाखल झालेल्या तक्रारींचीदेखील दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी थेट राज्य शासनाकडे तक्रारी केल्या.

राज्य शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात नाशिक महापालिकेशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या आहेत.

अतिक्रमण, नगररचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैद्यकीय, स्मार्टसिटी कंपनी, घनकचरा, पर्यावरण, पाणीपुरवठा, कर, प्रशासन, नगर नियोजन, यांत्रिकी या १२ विभागांशी संबंधित ३२ गंभीर तक्रारींची नगर विकास विभागाने दखल घेतली आहे.

स्थानिक पातळीवर दखल घेतली जात नसल्याने शासनाकडे दाखल झालेल्या या तक्रारी संदर्भात नगर विकास विभागाने महापालिकेकडे स्वंयस्पष्टता अहवाल मागितला आहे.

NMC Nashik News
Nashik News: विभाग प्रमुखांना नागरिकांना वेळ देणे बंधनकारक; NMC आयुक्त डॉ. करंजकर ॲक्शन मोडमध्ये

आयुक्त ‘ॲक्शन मोड’मध्ये

महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे देखील तक्रारींचा वाढला. थेट आयुक्तांकडे तक्रारी दाखल होत असल्याने विभागीय स्तरावर तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयुक्त करंजकर यांनी आठवड्यातील तीन दिवस तीन ते पाच ही वेळ निश्चित करून तक्रार यांचा निपटारा करण्याची सूचना दिली.

त्या पाठोपाठ आता राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ३२ गंभीर तक्रारी संदर्भात स्वयंस्पष्टता अहवाल मागविल्याने प्रशासकीय कामकाजातील ढिसाळपणा समोर आला आहे. आयुक्तांनी दखल घेत कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामाच्या पद्धतीत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

NMC Nashik News
NMC News : 1 टक्का निधी मिळविण्यासाठी महापालिकेची धाव; ब्लॅक स्पॉट मुक्तीसाठी परिवहन विभागाला पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com