मकरसंक्रांतीनिमित्त तीळ, गुळाचा गोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sankranti festival

मकरसंक्रांतीनिमित्त तीळ, गुळाचा गोडवा कायम

नाशिक : मकरसंक्रांतीनिमित्त लाडू, चिकी, वडी तयार करण्यासाठी चिक्की, सेंद्रिय गुळाला(organic jaggery powder) मागणी वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास वीस टक्क्यांनी मागणी वाढली असून, संक्रांतीला (sankranti 2022) लागणाऱ्या तीळ १६० रुपये किलोने विकली जात आहे. गुळाच्या किमतीत दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली असली तरी गुळाचा गोडवा कायम असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: महिलांमध्येही रुजतेय फिटनेसची क्रेझ

मकरसंक्रांतीला घरोघरी गूळ, तीळ, शेंगदाणामिश्रित पदार्थ करण्यात येतात. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या वस्तूंची मागणी वाढते. होलसेल बाजारात गुळाची ४७, तर चिकीच्या गुळाची ५० रुपये किलोने विक्री होत आहे. सेंद्रिय गूळ ७० रुपये किलो आहे. किरकोळ बाजारात साधा गूळ ५५ रुपये किलोने विकला जात आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतो आहे, तसेच राज्य सरकारने निर्बंध कडक केले असले तरी मकरसंक्रांत सणाचा गोडवा कायम असेल, अशी आशा गूळ विक्रेत्यांना आहे.

गुळाच्या पावडरलाही मागणी

गेल्या वर्षापासून गूळ विक्रेत्यांकडे गुळाबरोबर गुळाच्या पावडरची विक्री करण्यात येत आहे. गुळाच्या पावडरला ग्राहकांची पसंती बघता कंपन्या गुळाची पावडरचे उत्पादन करण्याकडे वळल्या आहेत. सध्या बाजारात गुळाची पावडर शंभर रुपये किलो दराने विकली जात आहे.

"गुळाच्या मागणीत नेहमीपेक्षा वीस टक्क्यांनी वाढ होत असते. यंदा गूळ पावडरला मागणी असून, चिकी आणि सेंद्रिय गुळाला मागणी जास्त आहे."

- राजेश वाघचौरे, व्यापारी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Makar Sankranti Festival
loading image
go to top