बनावट क्रीडा प्रमाणपत्रावर क्यूआर कोडचा तोडगा

एनआयएस प्रशिक्षक शिरीष चव्हाण यांची मागणी
Fake Certificate
Fake Certificate sakal

जुने नाशिक : बनावट क्रीडा प्रमाणपत्र तयार करून देण्याचा गोरख धंदा सुरू असल्याने प्रतिभावंत खेळाडूंच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून बनावट क्रीडा प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांना चांगला चाप बसू शकतो. क्रीडा मंत्रालयाकडून या प्रणालीचा अंगीकार करण्यात यावा, अशी मागणी एनआयएस प्रशिक्षक शिरीष चव्हाण यांनी केली आहे. त्याबाबतचा लढादेखील त्यांच्याकडून सुरू आहे.

Fake Certificate
वॉर्ड झटला; पण भोपळा नाही फुटला !

बनावट प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्यांची समाजास मोठी कीड लागली आहे. त्यातून क्रीडा क्षेत्रदेखील सुटलेले नाही. काही महिन्यांपूर्वी बनावट क्रीडा प्रमाणपत्र बनवून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनेक जणांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. यापुढे त्यांची चौकशी होणार असली, तरी त्यातून साध्य तरी काय होणार, असा प्रश्‍न खेळाडू विचारत आहेत. बनावट प्रमाणपत्र तयारच होणार नाही, याकडे क्रीडा मंत्रालयासह सरकारने बारीक लक्ष दिले पाहिजे. यासाठी एनआयएस प्रशिक्षक शिरीष चव्हाण झटत आहेत. खऱ्या खेळाडूंना खेळांचा सराव, स्पर्धा, प्रवास अशा विविध गोष्टींमुळे शिक्षणाकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. शैक्षणिक टक्केवारीत कुठेतरी कमी येत असते.

Fake Certificate
हरिभाऊ बागडेंसह माजी संचालकांसाठी एकवटले सर्व पक्ष, प्रचार थांबला

त्यांना देखिल शासकीय नोकरीचा लाभ मिळावा. यासाठी सरकारकडून खेळाडूंना काही प्रमाणात अतिरिक्त गुण दिले जातात. याचा लाभ मात्र खऱ्या खेळाडूंपेक्षा बनावट खेळाडूंनाच अधिक मिळत असतो. पैशाच्या जोरावर बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले जातात. त्याआधारे त्यांना शासकीय, तसेच खासगी परंतु मोठ्या क्षेत्रात नोकरी मिळण्यास मदत होते. अप्रत्यक्षरीत्या त्यांच्याकडून खऱ्या खेळाडूंच्या हक्कावर डल्ला मारला जातो. यासाठी क्यूआर कोड प्रणाली अतिशय उपयुक्त ठरणार आहे. खऱ्या खेळाडूंना त्यातून न्याय मिळण्यास मदत होईल. बनावट प्रमाणपत्र बनवण्याच्या भ्रष्टाचारास आळा बसेल. क्रीडा मंत्रालयाने या प्रणालीचा स्वीकार करावा. यासाठी श्री चव्हाण यांनी क्रीडा मंत्रालय, क्रीडा आयुक्त, जिल्हा क्रीडा अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे. शिवाय क्यूआर कोड प्रणालीदेखील समजावून सांगण्यात आली आहे.

असा बसेल आळा

क्यूआर कोड ही अतिशय साधी-सोपी पद्धत आहे. सरकार किंवा खासगी संस्थांनी आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धा, त्यातील सहभागी खेळाडू, विजेत्यांची चित्रफीत तयार करावी. अधिकृत संकेतस्थळ, यु-ट्युबवर ती प्रसारित करण्यात यावी. त्याची लिंक क्यूआर कोडमध्ये समाविष्ट करावी. तो क्यूआर कोड खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर नमुद करण्यात यावा. नोकरीच्या ठिकाणी किंवा अन्य कुठेही खेळाडूंनी प्रमाणपत्र घेऊन गेल्यास संबंधितांनी क्यूआर कोड स्कॅन केला, की त्यातून त्या खेळाडूची संपूर्ण माहिती स्पष्ट होऊ शकते. त्यातून प्रमाणपत्र बनावट आहे की खरे उघड होण्यास मदत होईल.

Fake Certificate
कोल्हापूर : हे ॲप डाउन लोड करा’, तासाला तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील

बनावट प्रमाणपत्र (fake certificate)क्रीडा क्षेत्राला लागलेली वाळवी आहे. यामुळे अवघ्या क्रीडा क्षेत्राला गालबोट लागते. क्रीडा क्षेत्राची (sports)प्रतिमाही मलिन होते. याचे समूळ नष्ट होणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी क्यूआर कोड (qr code )एकमात्र पर्याय आहे.

-शिरीष चव्हाण, एनआयएस प्रशिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com