Nashik Crime News : नाशिक हादरले! नाशिकरोड रेल्वेस्थानकावर विवाहित तरुणीवर अत्याचार

sexual assault of married girl at Nashik Road railway station nashik crime news
sexual assault of married girl at Nashik Road railway station nashik crime newsesakal

Nashik Crime News : मध्यरेल्वेने नवसारी येथून नाशिक मध्ये आपल्या बहिणीकडे आलेल्या मात्र मध्यरात्र झाल्याने रेल्वेस्थानकावर एकटी थांबलेल्या एका असहाय्य विवाहित तरुणीवर फुस लावून चेहडी शिव परिसरात दोघांनी सामूहिक अत्याचार केला.

याबाबात नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. (sexual assault of married girl at Nashik Road railway station nashik crime news)

बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रेल्वेतून उतरल्यानंतर एकटी असल्याचा फायदा घेत स्थानकावरील पाणीविक्रेता आणि रिक्षा चालक यांनी तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून, नाशिकरोड पोलिसांनी दोन्ही संशयीत आरोपींना अटक केली आहे.

नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित तरुणी ही 19 वर्षाची असून ती नवसारी येथून मुंबई मार्गे नाशिक येथील तिच्या बहिणीकडे येत असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्थानकावर उतरली.

स्थानकावर उतरल्यानंतर पीडित तरुणीने महिला सहप्रवासीच्या मोबाईलवरून बहिणीला फोन केला, मात्र खूप रात्र झाली असल्याने तू आता येण्याची घाई करु नकोस रेल्वेस्थानकावरच थांबून रहा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

sexual assault of married girl at Nashik Road railway station nashik crime news
Crime news : संभाजीनगर हादरलं! विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक बलात्कार

सकाळी तुला मी घेण्यास येते असे बहिणीने तिला सांगितले. त्यामुळे पीडितेने कुठलाही धोका न पत्करता रेल्वेस्थानकावरच थांबण्याचा निर्णय घेतला.

यादरम्यान रेल्वेस्थानकावरील पाणी विक्रेता कुणाल पवार याने मदतीचे सोंग करत तिला खाद्यपदार्थ दिले. यावेळी आपला रिक्षा चालक मित्र प्रकाश मुंडे याला बोलवून घेतले. पीडित तरुणीला चेहडी शिव परिसरातील पेरूच्या बागेत नेऊन दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला मारहाण करून कोणाला काही सांगितल्यास मारण्याची धमकी दिली.

यावेळी तरुणीने प्रतिकार करत तेथून पळ काढीत आरडा ओरडा केला, तेव्हा शेजारील इमारतीच्या सुरक्षारक्षकाच्या मदतीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. नाशिकरोड पोलिसांनी संबंधित तरुणीला विश्वासात घेऊन आरोपींची माहिती घेतली. त्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी संशयित आरोपींच्या वर्णनावरून दोघांना गुरुवारी सायंकाळी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sexual assault of married girl at Nashik Road railway station nashik crime news
Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर- आंबोली रस्त्यावर 87 लाखांचा अवैध गुटखा जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com