Board Exam : शहाद्यात बारावी परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर

SSC HSC Board exam
SSC HSC Board exam esakal

शहादा (जि. नंदुरबार ) : येथील (कै.) डॉ. विश्रामकाका शैक्षणिक संकुल आवारात असलेल्या कै. सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या (HSC)

विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू होत असून, एक हजार ५०९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. (Shahada 12th exam seat arrangement announced nandurbar news)

परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी पेपर सुरू होण्याच्या एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, अशी माहिती केंद्र संचालक तथा प्राचार्य आय. डी. पटेल यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या बारावी वर्गाचा कला, विज्ञान, वाणिज्य व किमान कौशल्य विभागाच्या वार्षिक परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ पासून परीक्षा केंद्रांवर सुरू होणार आहे.

परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाकडून या वर्षीच्या होणाऱ्या परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त करण्यात येणार असून, ‘कॉफीमुक्त अभियान’ परीक्षा राबविण्याचे आदेश केंद्र संचालकांना देण्यात आलेले आहेत.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

SSC HSC Board exam
Board Exam : तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे; विद्यार्थ्यांना आवाहन

शहादा येथील (कै.) डॉ. विश्रामकाका शैक्षणिक संकुल आवारातील (कै.) सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक ०६२१ (ब) या केंद्रावर शहादा येथील (कै.) सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सरोदय विद्यामंदिर (प्रकाशा), के.वाय.आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय (कहाटूळ),

निशांत कनिष्ठ महाविद्यालय व सारंगखेडा येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा सहभाग आहे. बारावी कला, विज्ञान, वाणिज्य व किमान कौशल्य विभागाच्या परीक्षा होणार असून, या परीक्षा केंद्रांवर एकूण एक हजार ५०९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत.

यात विज्ञान शाखेतून बैठक क्रमांक एस ५१११२ ते एस ५२०१९ असे एकूण (९०५) विद्यार्थी, कला शाखेसाठी एस ११५३२६ ते ११५७८४ असे एकूण (४५१) विद्यार्थी, वाणिज्य विभागासाठी एस १५१८६४ ते १५१९४८ असे एकूण (८५) विद्यार्थी तसेच किमान कौशल्य विभागाकरिता एस १६०५८६ ते १६०६४३ असे एकूण (५७) विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत.

SSC HSC Board exam
Dada Bhuse | .... तर दादा भुसे मुख्यमंत्र्यांना विरोध करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com