Dada Bhuse | .... तर दादा भुसे मुख्यमंत्र्यांना विरोध करणार

eknath shinde & dadaji bhuse
eknath shinde & dadaji bhuseesakal

नाशिक : नाशिक महसूल विभागाचे विभाजन करून स्वतंत्र खानदेश महसूल विभाग करण्याची मागणी आहे.

परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. (dada bhuse will oppose chief minister of Demand for separate Khandesh Revenue Department division nashik news)

जर असा निर्णय घेतलाच तर आम्ही कशासाठी? असे म्हणत प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोध करण्याचा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी आज दिला.

नाशिक महसूल विभागाचे विभाजन करून जळगाव, धुळे आणि नंदुरबार अशा तीन जिल्ह्यांचा स्वतंत्र खानदेश महसूल विभाग करण्याची त्या भागातून मागणी असून काल गुरुवारी नंदुरबार येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याअनुषंगाने मागणी झाली.

मुख्यमंत्री शिंदे स्वतंत्र खानदेश महसूल विभागाच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याची चर्चा आहे. त्याविषयी आज (ता. १७) नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना विचारले असता, ते बोलत होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

eknath shinde & dadaji bhuse
Nashik News : नांदगाव बाजार समितीतून ट्रॅक्टर चोरीला; संतप्त शेतकऱ्यांचा प्रवेशद्वारावर रास्तारोको

श्री भुसे म्हणाले की स्वतंत्र खानदेश महसूल विभागाची फक्त मागणी आहे.पण याबाबत असा कुठलाही विचार नाही. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याविषयी काहीही निर्णय घेतलेला नाही. काल (ता.१६) दिवसभर मी मुख्यमंत्र्यासोबत होतो.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व नगर हे दोन्ही प्रमुख जिल्हे वगळून स्वतंत्र खानदेश महसूल विभाग करण्याची किंवा त्या भागात विभागीय कार्यालय नेण्याची कुठलीही मागणी असली तरी त्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.

मग आम्ही कशासाठी ?

स्वतंत्र खानदेश महसूल विभागाबाबत निर्णय न झाल्यास, आम्ही कशासाठी? असे स्पष्ट करीत, श्री भुसे यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यास त्यांच्या निर्णयाला विरोध करण्याचा थेट विरोध करण्याचा इशारा दिला.

eknath shinde & dadaji bhuse
Nashik News : गर्भवतीवर अर्धांगवायूच्या झटक्‍यानंतर यशस्‍वी उपचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com