Crime
sakal
शहादा येथे मावळत्या वर्षाच्या मध्यरात्री हॉटेलच्या वेटरनी आदिवासी अल्पवयीन मुलीला उचलण्याचा प्रयत्न केला असता, आजोबांना जाग आली. त्या वेळी आरोपींनी धारदार हत्याराने त्यांचा खून केला आणि अंधारात पसार झाले. गुन्ह्याचा तपास करताना तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी चौघांना अटक केलीच; परंतु विशेष बाब म्हणून खटला फास्ट ट्रॅकवर चालवून अवघ्या सहा महिन्यांत निकाल लागला आणि आरोपींना जन्मठेप झाली.