शिक्षकांच्या प्रश्‍नावर लवकरच संयुक्त बैठक; शरद पवारांचे आश्‍वासन | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

शिक्षकांच्या प्रश्‍नावर लवकरच संयुक्त बैठक; शरद पवारांचे आश्‍वासन

sakal_logo
By
शरद भामरे

जुनी शेमळी (जि. नाशिक) : महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, नवनिर्वाचित राज्याधक्ष अंबादास वाजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रश्‍नी लवकरच संयुक्ती बैठक घेण्याचे आश्‍वासन ना. पवार यांनी शिष्टमंडळाला दिले.

निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, आंतरजिल्हा बदल्या त्वरित सुरू करणे, आंतरजिल्हा आणि आपसी बदल्यांबाबत धोरण ठरविणे, जिल्हाअंतर्गत बदल्या होण्यासाठी ग्रामविकास मंत्री महोदयांना त्वरित आदेश देणे, ३० जून व तीन वर्षे अशी दुरुस्ती करणे, २००४ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांच्या वेतन त्रुटीबाबत चर्चा करून सातवा वेतन आयोग व वेतन त्रुटीबाबत दुसरा खंड प्रकाशित करणे, वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा (वस्तीशाळा सुरू झाल्यापासून) धरून वेतन व वेतन भत्ते, सेवा पुस्तकात नोंद घेणे, एमएस-सीआयटीसाठी डिसेंबर २०२१ अखेर मुदतवाढ द्यावी, मुख्यालयासाठी ग्रामसभा दाखल्याची अट रद्द करावी आदी प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. याप्रश्‍नी लवकरच ग्रामविकास विभाग, शालेय शिक्षण विभाग आणि नगरविकास विभागाच्या खात्याची शिक्षक संघासमवेत एक संयुक्त बैठक घेण्याचे आश्‍वासन ना. पवार यांनी दिले.

या वेळी अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे सचिव बाळासाहेब झावरे, औरंगाबादचे इसाक पटेल, नाशिक जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे, राज्य उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, उद्योजक श्री. घाडगे, सरचिटणीस धनराज वाणी, प्रवीण कुमावत आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : उड्डाणपुलावर उभ्या कंटेनरला कारची धडक; एक ठार

loading image
go to top