Sharad Pawar: जरांगेंशी आमचा कसलाही संबंध नाही: शरद पवार यांची स्पष्टोक्ती; आरक्षणप्रश्‍नी एकत्रित विचार करण्याचे आवाहन

Reservation Issue Needs Collective Thinking: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने रविवारी नाशिकमध्ये राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर आयोजित केले होते. त्यापाठोपाठ सोमवारी (ता.१५) जनआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. यानिमित्त नाशिकमध्ये आलेल्या शरद पवार यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला.
Sharad Pawar

Sharad Pawar

saka

Updated on

नाशिक: मराठा व ओबीसी आरक्षणावरून राज्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघत असताना मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी आमचा कसलाही संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांच्याशी आमचा संबंध नाही, त्यांच्याविषयी जास्त बोलणे योग्य नाही. मात्र, आरक्षणाच्या प्रश्‍नावर सर्वांनी एकत्र येऊन विचार करण्याची आवश्‍यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com