sakal
नाशिक : ‘‘राज्य सरकारने आरक्षणाच्या बाबतीत स्वतंत्र समित्या स्थापन करून त्यावर विशिष्ट लोक घेतले आहेत. सरकार हे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे असावे. परंतु, या सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नसून तेढ वाढवायची आहे. यातून महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली जात असून एका समाजाचे लोक आता दुसऱ्या समाजाच्या घरी, दुकानात जात नाहीत, इथपर्यंत परिस्थिती खालावली आहे,’’ अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली. सामाजिक ऐक्याबाबत आपण कधीच तडजोड करणार नसल्याचेही पवार म्हणाले.