Sharad Pawar and Supriya Sule
sakal
नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शरद पवार शनिवार (ता. १३)पासून चार दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यादेखील शनिवारी नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. १४) शहरात पक्षाचे शिबिर होत असून, सोमवारी त्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा निघेल. याव्यतिरिक्त चार दिवसांमध्ये विविध ठिकाणी उद्घाटन व कार्यक्रमांचे प्रयोजन असल्याने हा दौरा लक्षवेधी ठरला आहे.