
नाशिक : शिंदे ग्रामपंचायतीचा मुलींसाठी अनोखा उपक्रम
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्ताने (International Women's Day) शिंदे (ता. नाशिक) ग्रामपंचायतीतर्फे (Gram panchayat) धनश्री योजना सुरु करण्यात आली. राज्यात प्रथमच आदर्शवत होईल अशा योजनेत गावातील कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने तीन हजाराची बँकेत मुदतठेव (Fixed Deposit) ठेवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. सरपंच गोरख जाधव यांनी ही माहिती दिली. शिंदे गावातील स्थानिक कुटुंबात मुलगी जन्माला आली तर मुलीच्या नावे ग्रामपंचायत तीन हजार रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट करणार असून, महिला सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने उचललेले मोठे पाऊल ठरणार आहे.
हेही वाचा: Women's Day : पतीला किडनी दान करणारी आधुनिक सावित्री
महिला दिनाचे कार्यक्रम सर्वत्रच होतात, मात्र शिंदे ग्रामपंचायतीने महिला दिनाचे (International Women's Day) औचित्य साधत ८ मार्चपासून गावातील स्थानिक कुटुंबात जन्मलेल्या मुलीच्या नावे तीन हजार रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत राहणार आहे. एकवीस वर्षानंतर तयार होणारी एकूण रक्कम तिच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी वापरात येऊ शकते. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. महिलादिनी कोरोनाकाळातील कामकाजाबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ( Primary Health Center) वैद्यकीय अधिकारी योगिता वळवी, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत महिला कर्मचारी, आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा: IND vs WI Women's WC : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर १५५ धावांनी विजय
तत्पूर्वी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुवर्णा हांडोरे व माजी सरपंच रतन जाधव यांची भाषणे झाली. सरपंच गोरख जाधव, माजी सरपंच रतन जाधव, उपसरपंच अनिता तुंगार, अशोक बोराडे, बाजीराव जाधव, ज्ञानेश्वर जाधव, गणपत जाधव, भाऊराव धुळे, रामदास तुंगार, संजय तुंगार, मोतीराम जाधव, विश्वनाथ जाधव, किरण तुंगार, वंदना जाधव, हिराबाई जाधव, सुप्रिया तुंगार, अर्चना जाधव, संगीता बोराडे, अश्विनी साळवे, रीना मते, आदींसह महिला उपस्थित होत्या. मान्यवरांचे स्वागत व आभार माधुरी जाधव यांनी मानले.
Web Title: Shinde Gram Panchayat Initiative For Girls Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..