मुलीच्या जन्माचे स्वागत मुदत ठेवीने

शिंदे ग्रामपंचायतीचा मुलींसाठी अनोखा उपक्रम
Shinde Gram Panchayat initiative for girls Welcoming birth of  daughter with term deposit nashik
Shinde Gram Panchayat initiative for girls Welcoming birth of daughter with term deposit nashiksakal

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्ताने शिंदे (ता. नाशिक) ग्रामपंचायतीतर्फे धनश्री योजना सुरु करण्यात आली. राज्यात प्रथमच आदर्शवत होईल अशा योजनेत गावातील कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने तीन हजाराची बँकेत मुदतठेव ठेवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. सरपंच गोरख जाधव यांनी ही माहिती दिली.

शिंदे गावातील स्थानिक कुटुंबात मुलगी जन्माला आली तर मुलीच्या नावे ग्रामपंचायत तीन हजार रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट करणार असून, महिला सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने उचललेले मोठे पाऊल ठरणार आहे.महिला दिनाचे कार्यक्रम सर्वत्रच होतात, मात्र शिंदे ग्रामपंचायतीने महिला दिनाचे औचित्य साधत ८ मार्चपासून गावातील स्थानिक कुटुंबात जन्मलेल्या मुलीच्या नावे तीन हजार रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट मुलगी एकवीस वर्षांची होईपर्यंत राहणार आहे. एकवीस वर्षानंतर तयार होणारी एकूण रक्कम तिच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी वापरात येऊ शकते.

ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. महिलादिनी कोरोनाकाळातील कामकाजाबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी योगिता वळवी, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत महिला कर्मचारी, आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुवर्णा हांडोरे व माजी सरपंच रतन जाधव यांची भाषणे झाली. सरपंच गोरख जाधव, माजी सरपंच रतन जाधव, उपसरपंच अनिता तुंगार, अशोक बोराडे, बाजीराव जाधव, ज्ञानेश्वर जाधव, गणपत जाधव, भाऊराव धुळे, रामदास तुंगार, संजय तुंगार, मोतीराम जाधव, विश्वनाथ जाधव, किरण तुंगार, वंदना जाधव, हिराबाई जाधव, सुप्रिया तुंगार, अर्चना जाधव, संगीता बोराडे, अश्विनी साळवे, रीना मते, आदींसह महिला उपस्थित होत्या. मान्यवरांचे स्वागत व आभार माधुरी जाधव यांनी मानले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com