

Chandwad Farmer Ends Life After Crop Loss and Financial Stress
Sakal
गेल्या काही वर्षांपासून कोरडा आणि ओला दुष्काळ या दुहेरी संकटामुळे मढे यांची शेती अक्षरशः उद्ध्वस्त झाली होती. उत्पादन खर्चही न निघाल्याने वडिलांच्या नावे असलेले सोसायटीचे कर्ज फेडणे अशक्य झाले. दोन मुलींचे लग्न करण्यासाठी त्यांनी नातेवाईकांकडून उसनवारीने पैसे उभे केले, तर २०२३-२४ आर्थिक वर्षात शासकीय योजनेतून मंजूर झालेला बैलगोठा बांधण्यासाठीही हातउसनी पैसे घेतले.