Shirdi Bus Accident : अपघातग्रस्त रुग्णांना औषध उपचारानंतर मिळाला Discharged! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shirdi Bus Accident

Shirdi Bus Accident : अपघातग्रस्त रुग्णांना औषध उपचारानंतर मिळाला Discharged!

बातमीदार : विकास गिते

नाशिक : शिर्डी महामार्गावरील शुक्रवारी पाथरे गावाजवळील खासगी बसच्या अपघातात दहा साई भक्त हे ठार झाले होते. तर 23 ते 25 भाविक जखमी झाल्याने त्यांना सिन्नर येथील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. (Shirdi Bus Accident case patients got discharged after treatment nashik news)

त्यातच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य सरकार प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. जखमी व्यक्तींवरील उपचारांचा खर्च सरकार करणार असून या अपघाताची चौकशी करण्याचे आदेशही शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते.

त्या अनुषंगाने सिन्नर शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी सिन्नर येथे येत तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी वाहने करून त्यांना आपल्या गावी सुरक्षितरित्या पाठवले. याशिवाय जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

शहरातील यशवंत हॉस्पिटल मधून निधी नरेश उबाळे ,शिवज्ञा सुहास बारस्कर, बबली कहार, सुहास देवी कहार, जिगर रामा कहार, अरुणा संतोष पोटोले, संतोष गंगाराम पोटोले, चिन्मय प्रभाकर पोटोले रंजना पोटोले,आशा जयस्वाल यांना औषध उपचार करून शुक्रवारी व शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Nashik News : लडाख- तिबेटमधील स्थलांतरित चक्रवाकचा मृत्यू; नांदूरमधमेश्‍वरमधील घटना

तर खालील काही गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लागलीस त्यांना बरे वाटले तर घरी सोडून देण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. यामध्ये माया जाधव, प्रशांत मोहती, सिमा लोके, सपना डांगे, हर्षद वाडेकर, मनिषा वाडेकर, सुपिया बाहिम, वर्षा राणी बेहरा, श्रुतिका गोंधळे, मयुरी बाईत हे ऍडमिट असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.

तर मातोश्री हॉस्पिटल येथील खालील तीन रुग्णांना निर्मल गोकुळ गच्छायत, प्रविणा प्रविण कुरटे, सुहास तानाजी बारस्कर या अपघातग्रस्त रुग्णांना शुक्रवारी दुपारी उपचार करून घरी सोडण्यात आले.

हेही वाचा: MGNREGA News : दुखणं ऑनलाइन हजेरीचं अन् बदनामी मात्र मोबाईल ॲपची!