नाशिक: उत्तर महाराष्ट्राचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीत सोमवारी (ता. ११) अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे दोन गट एकमेकांसमोर भिडल्याने चांगलाच राडा झाला. एकमेकांची कॉलर धरत शिवीगाळही करण्यात आली. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी हे किरकोळ भांडण असून, त्याची योग्य ती दखल घेतली जाईल, असे सांगत यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.