Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीचाच भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
Shiv Sena Booth Leaders Workshop in Nashik : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करीत शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, निवडणुकीत कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असे स्पष्ट करीत स्वबळाच्या चर्चेला एकप्रकारे विराम दिला.
नाशिक: महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजना मतदारांपर्यंत पोहोचवा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. कार्यकर्त्यांच्या विजयासाठी मंत्री, खासदार, आमदार कार्यकर्ता बनून लढतील.