Politics
Politics esakal

भाजपच्या स्टेजवर शिवसेनेच्या नगरसेविकेने वेधले लक्ष

सिडको (नाशिक) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याच्या उद्‌घाटन कार्यक्रमप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे-दराडे यांनी सर्वांचे लक्ष वेधल्याचे दिसून आले.

भगवा अवतार अन् नेत्यांच्या मनात अस्वस्थता

पुतळा उद्‌घाटनप्रसंगी संपूर्ण वातावरण भाजपमय झाले होते. अशातच सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे दराडे यांनी केवळ शिवसेनेचे नाव असलेली पट्टी गळ्यात घातल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते. त्यांचा हा भगवा अवतार बघून काही काळ स्टेजवर वातावरण बदलल्याचे बघायला मिळाले. तर, काही गडबड होऊ नये म्हणून भाजपच्या नगरसेविका व तेथील बाऊंसर देखील त्यांच्यावर नजर ठेवून होते. आपण या प्रभागाच्या नगरसेविका आहोत. त्यामुळे स्टेजवर उपस्थित होते. गळ्यात शिवसेनेची नाव असलेली पट्टी परिधान करणे यात काही गैर नाही, अशी प्रतिक्रिया किरण दराडे यांनी बोलताना दिली.

Politics
नाशिक : फडणवीसांच्या ‘त्या’ चुकीने शिवप्रेमी नाराज
Politics
सप्तश्रृंगी गडावर भाविकांकडून आकारण्यात येणाऱ्या करात वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com