शिवसेनेच ठरलं! मे महिन्यात अयोध्येला जाणार - संजय राऊत

Sanjay Raut
Sanjay Raut Sakal
Updated on

नाशिक : नाशिक शिवसेनेने अयोध्येसाठी एक कार्यक्रम आखला होता. नाशिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत अयोध्येतील कार्यक्रमाचे स्वरुप इतके मोठे झाले की, या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांना आमंत्रित करण्याचे ठरले. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) येणार म्हटल्यावर आता हा कार्यक्रम नाशिकपुरता न राहता तो राज्याचा कार्यक्रम ठरला. मे महिन्यात शिवसेनेचा आयोध्येला कार्यक्रम होणार आहे अशी माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राऊत दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहे. आज दुपारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचा आमचा संकल्प कायम आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ता हाती घेतल्यापासून कोविडसह अनेक संकटे आली. अशाही स्थितीत अनेक संकल्प पूर्ण केले. त्यासाठी अयोध्येत जाणार आहे. आम्ही आज अयोध्येला जात नाही. बाबरी ढाचा पाडला गेला तेव्हापासून आम्ही शिवसैनिक अयोध्येत जातो आहे.

Sanjay Raut
निवडणुकांच्या तोंडावर संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्या : संजय राऊत

भाजपचा घेतला समाचार

राऊत यांनी भाजपवर आरोप करत चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले सत्तेअभावी वैफल्यग्रस्त झालेल्या भारतीय जनता पक्षांकडून (BJP) राज्यात दंगली घडविण्याचा कट आखला जात आहे. भोंगे लाऊन हिंदूत्व वाढत नाही. कोल्हापूरकरांनी त्यांचे भोंगे खाली उतरवले त्यानंतरही राज्यात भोंग्यांवरून घाणेरडं राजकारण सुरु आहे. मात्र भीमरुपी वज्र हनुमान मारुती हा सदैव आमच्याच पाठिशी आहे. कोल्हापूरच्या निवडणूकीत हा त्याचा दाखला आहे. आज हनुमान जयंती आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपले.

Sanjay Raut
वैफल्यग्रस्त भाजपकडून राज्यात दंगलीचा कट - संजय राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sanjay Garud Arrest Latest News
Saikheda schoolgirl story
Nashik Earthquake
Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor
Marathi News Esakal
www.esakal.com