esakal | सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडर गायब? शिवसैनिकांची कारवाईची मागणी

बोलून बातमी शोधा

Sinnar Rural Hospital

सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडर गायब? शिवसैनिकांची कारवाईची मागणी

sakal_logo
By
अजित देसाई


सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयातून रात्री भरलेले ऑक्सिजन सिलिंडर गायब होत असून, रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याची तक्रार करीत शिवसैनिकांनी गुरुवारी (ता. २९) रात्री सिन्नर ग्रामीण कोविड रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करीत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

काळा बाजार होत असल्याचा आरोप

रात्री उशिरापर्यंत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयातून बुधवारी रात्री नऊ भरलेले ऑक्सिजन सिलिंडर गायब झाल्याची तक्रार शिवसैनिकांनी केली आहे. याबाबत सकाळी चर्चा रंगल्यानंतर शिवसैनिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र गैरसमजुतीतून रिकाम्याऐवजी भरलेले सिलिंडर नेण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. भरलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचा काळा बाजार होत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. दरम्यान, दिवसभरात रुग्णालयात ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याचे सांगून रुग्णांना बेड न देता इतरत्र पाठविण्याचा सल्ला दिला जात असल्याची माहिती माजी आमदार वाजे यांनी दिली.

हेही वाचा: संतापजनक प्रकार! जात पंचायतने महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा..

शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांनी बाहेर येऊन कोणतेही उत्तर दिले नसल्याचे सांगळे यांनी सांगितले. दररोज रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडर गायब होत असल्याचा अंदाज शिवसैनिकांनी व्यक्त केला. या आंदोलनानंतर पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयातून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचाही काळा बाजार होत असल्याचा संशय उदय सांगळे यांनी व्यक्त केला. रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडरची चौकशी करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. या वेळी नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक पंकज मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, पिराजी पवार, गौरव घरटे, शैलेश नाईक, विजय जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा: वा रे पठ्ठ्या! पोलिस ठाण्यातच लगावली पोलिसाच्या कानशिलात; दोघांविरुद्ध गुन्हा