

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यामुळं अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना जरी सत्तेत एकत्र बसलेले असले तरी स्थानिक कार्यकर्ते मात्र एकमेकांच्याविरोधात असल्याचं चित्र असल्याची सध्या चर्चा आहे.