'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषाने दुमदुमला विश्रामगड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vishramgad

'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषाने दुमदुमला विश्रामगड!

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील ठाणगाव येथील विश्रामगड विकास मंडळाच्या वतीने विश्राम गडावर 342 वा शिव पदस्पर्श दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. शिव पदस्पर्श दिनानिमित्त पंचक्रोशीतील सर्व शिवभक्त व आबालवृद्धांनी कार्यक्रमाला हजेरी लावत छ्त्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. 'शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी' 'जय शिवाजी', 'जय जिजाऊ- जय शिवराय', 'छत्रपती संभाजी महाराज की जय', 'हर हर महादेव' आदी घोषणांनी गड दुमदुमला

महाराजांनी केले पट्टा किल्ल्याचे 'विश्रामगड' हे नामकरण

22 नोव्हेंबर 1679 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची लूट करून बहिर्जी नाईक या मावळ्याने महाराजांना विश्रामगड (पट्टा किल्ला) येथे सुखरूप आणले होते. महाराजांनी या गडावर 15 दिवस मुक्काम केला होता, यामुळे ठाणगाव येथील विश्रामगड विकास मंडळ व जनसेवा सेवाभावी संस्था यांच्या वतीने दरवर्षी 22 नोव्हेंबर हा दिवस 'शिव पदस्पर्श दिन' म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर विश्रामगडावर नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, इगतपुरी, अहमदनगर आदी परिसरातील शिवप्रेमींनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा: आगामी निवडणूकांमध्ये मतदारांची संख्या घटणार?

वरुणराजाने लावली हजेरी

संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते पालखी पूजन करून ठाणगाव मधून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत माजी आदिवासी विकास मंञी मधुकर पिचड, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, करण गायकर, तनुजा घोलप, नामदेव शिंदे, रविंद्र पवार, अरुण केदार, बबन काकड, रामदास भोर, योगेश शिंदे आदी मान्यवर मिरवणूकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत पू. रा. भोर विद्यालयातील लेझिम व झांज पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. गावातून मिरवणूक झाल्यानंतर विश्रामगड येथे छ्त्रपती शिवजी महाराजांच्या पुतळ्यास संभाजीराजे भोसले, माजी आमदार राजाभाऊ वाजे, नामदेव पा. शिंदे, रामदास भोर, करण गायकर, योगेश शिंदे यांच्या हस्ते दुग्धाअभिषेक व वरुणराजाने हजेरी लावल्याने जलाभिषेक करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्रामगड विकास महामंडळ, जनसेवा सेवाभावी संस्था, शिवजन्मोत्सव समिती समस्त ठाणगाव ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

हेही वाचा: नाशिक : सांस्‍कृतिक राजकारणात ‘जयभीम’ मैलाचा दगड

शिवरायांचे किल्ले हीच जिवंत समाधी - संभाजी राजे भोसले

विश्रामगडावर संभाजी राजे भोसले यांनी गडावरील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गडावर भर पावसात जात गडावरील पुतळ्यास वरुणराजाच्या साक्षीने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर संभाजी राजांनी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवभक्तानां मुसळधार पावसात मार्गदर्शन करतांना सांगितले, कि फोर्ट फांउडेशनच्या वतीने वीस किल्ले दत्तक घेतले असून त्यात विश्रामगड हा किल्ला दत्तक घेत असून यापूढे किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले, जिवंत किल्ले हिच खरी महाराजांची खरी समाधी आहे, तेव्हा तिची संवर्धन करणे ही काळाजी गरज आहे, गडाची डागडुजी करतांना नविन पध्दतीने न करता जुन्या पध्दतीने करण्यात येईल त्यासाठी पोर्ट फांउडेशन कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top