esakal | 'आत्ताही वेळ गेलेली नाही' भर लग्नात युवतीचा नवऱ्याला इशारा! Viral Video मागे अशी कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

nashik video

लग्‍नातील 'त्‍या' व्‍हायरल व्‍हिडीओ मागे अशी होती अशी कहाणी!

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : लग्‍नमंडपात बसलेला नवरदेव, त्‍याला इशाऱ्यातून तेथून बाहेर पडण्यासाठी सांगणाऱ्या युवतीचा व्‍हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्‍हायरल होतोय. या व्‍हिडीओसोबत वेगवेगळ्या प्रकारचे संदेश लिहित फॉरवर्ड करण्यात आले. पण लग्‍नातील व्‍हायरल झालेल्‍या त्‍या व्‍हिडीओची रंजक कहाणी काहीशी वेगळीच आहे.(story-behind-viral-video-of-wedding-nashik-marathi-news)

'आत्ताही वेळ गेलेली नाही, येथून बाहेर पड'

व्‍हिडीओत दिसणारी युवती मुंबई स्‍थित अंकिता प्रभू-वालावलकर या आहेत. त्‍यांच्‍याशी संपर्क साधतांना 'सकाळ'ने व्‍हिडीओच्‍या मागची रंजक कहाणी जाणून घेतली. यावेळी अंकिता प्रभू-वालावलकर म्‍हणाल्‍या, की फ्रेंड्‌स ग्रुपमधील विजय मुणगेकर याचा तो विवाह सोहळा होता. व्‍हिडीओमध्ये कुठलाही प्रकारचा संवाद नसल्‍याने विविध पातळ्यांवर तर्कवितर्क लावले गेले. पण खर्या अर्थाने तो व्‍हिडीओ अगदी सहजरित्‍या व मस्‍करीत शुट केला गेला. खरं तर विजयच्‍या मनात लग्‍नाविषयी काहीशी भिती होती. तो लग्‍नमंडपात बसलेला असतांना 'आत्ताही वेळ गेलेली नाही, येथून बाहेर पड' असे गम्‍मत म्‍हणून इशाऱ्यात त्‍याला सांगत होते. आम्‍ही मित्रमंडळीने मस्‍करीत हा व्‍हिडीओ तयार केला होता. पण हा व्‍हिडीओ वेगवेगळ्या अर्थाने घेतांना व्‍हायरल करण्यात आला.

तीन दिवसांपूर्वीच दिले होते प्रशिक्षण

लग्‍नसमारंभ म्‍हटला की धावपळ, गडबड गोंधळ आलेच. पण व्‍हिडीओ शुट करायचे ठरल्‍यानंतर नेमका कसा प्रतिसाद द्यायचा आहे, कशी ॲक्‍शन करायची आहे, याबद्दल विजयला लग्‍नाच्‍या तीन दिवसांपूर्वीच कल्‍पना, प्रशिक्षण दिले होते. तसा सरावही केला होता, असे अंकिता प्रभू वालावलकर म्‍हणाल्‍या.

अभियंता असलेल्‍या अंकिता शिक्षकाच्‍या भूमिकेत

अंकिता यांनी सिव्‍हील इंजिनिअरींग केलेले आहे. गेल्‍या २०१७ पासून त्‍या आंतरराष्ट्रीय शाळेत गणित विषयाच्‍या अध्ययनाचे काम करताय. या दरम्‍यान त्‍या कंपनीत अभियंता म्‍हणूनदेखील कार्यरत होत्‍या. पण कौटुंबिक जबाबदार्यांमुळे २०१९ मध्ये त्‍यांनी नोकरी सोडली. यशस्‍वी व्‍यावसायिक म्‍हणूनही त्‍यांनी नावलौकिक मिळविले आहे. मनोरंजन म्‍हणून इन्‍टाग्रामला रिल्‍स अपलोड करत असतांना त्‍यांचे पन्नास हजाराहून अधिक फॉलोअर्स देखील आहेत.

सामाजिक कार्यात पुढाकार

अंकिता प्रभू वालावलकर यांचा सामाजिक उपक्रमांमध्येही सहभाग राहिला आहे. विविध सामाजिक संस्‍थांच्‍या उपक्रमात सहभागी होत श्रमदान केले आहे. कोरोना महामारीत मलाड परीसरातील झोपडपट्टीत राहाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्‍या पोषण आहार उपक्रमास त्‍यांनी बळ दिले. अशाच काहीशा सामाजिक उपक्रमांमध्ये त्‍यांचा सहभाग असतो.

हेही वाचा: नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या सुरक्षेला छेद; 5 लाख गायब

हेही वाचा: इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट

loading image