Nashik Crime News : सरकारी कामात अडथळा प्रकरणी बडगुजर यांच्यासह तिघांना शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhakar Badgujar

Nashik Crime News : सरकारी कामात अडथळा प्रकरणी बडगुजर यांच्यासह तिघांना शिक्षा

नाशिक : 2014 लोकसभा वेळी शासकीय कामात अडथळा आणि सहायक पोलिस आयुक्ताला अरेरावी केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह तिघांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. (shivsena sudhakar Badgujar and three others were punished in case of obstructing government work Nashik Crime News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

बडगुजर यांच्यासह ज्ञानेश्वर वासुदेव बडगुजर आणि राकेश निंबा शिरसाठ अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात तिघांना एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बडगुजर यांनी तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिह राजपूत यांच्याशी अरेरावी केली होती. याप्रकरणी बडगुजर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा अंबड पोलिसात दाखल करण्यात आला होता.