
नाशिक: ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांच्यासह नाशिकमधील आणखी काही नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम केला. दरम्यान, नाशिकमध्ये ठाकरे गटातील काही नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. शिवेसना ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुखांची पत्नी आणि माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय. शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांच्या पत्नीसह माजी नगरसेवक किरण गामने, पुंजाराम गामने आणि सीमा निगळ हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.