Shivsena Vardhapan Din News : सगळ्या शिवसैनिकांना जय महाराष्ट्र !; छगन भुजबळांकडून जून्या आठवणींना उजाळा

chagan bhujbal news
chagan bhujbal newsesakal

Nashik News : सगळ्या शिवसैनिकांना जय महाराष्ट्र! असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. १९) येथे जून्या आठवणींना उजाळा दिला.

निमित्त होते, शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त पत्रकारांशी साधलेल्या संवादाचे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना आमच्या मनात आहे, असे सांगतानाच, श्री. भुजबळ यांनी सर्वदूर निवडणुकांवेळी खरी शिवसेना कोणती याचे उत्तर लोक देतील, असेही स्पष्ट केले.(Shivsena Vardhapan Din update Jai Maharashtra to all Shiv Sainiks and Relive old memories from by chagan bhujbal Nashik News)

शिवसेनेत फूट पडली हे मनाला पटत नाही असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की शिवसेनेची पंचवीस वर्षाची वाटचाल मला आठवते.

पहिल्या शाखांप्रमुखांपैकी मी एक आहे. शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी त्यावेळी मुंबईतील माझगाव, भायखळा, चेंबूर अशा विविध भागातील कार्यकर्ते ट्रक भरुन जायचे. १९७३ मध्ये मी शिवसेनेचा नगरसेवक झालो. १९७८ मध्ये मला गटनेता केले.

त्यावेळीपासून बाळासाहेबांनी मला शिवाजी पार्कवरील सभेत इतर नेत्यांसोबत भाषणाची संधी देण्यास सुरवात केली. पुढे शिवसेनेने मला मुंबईचा महापौर, आमदार अशा जबाबदाऱ्या दिल्या. शिवसेनेत अभेद्य एकजूट होती. कठीण प्रसंगात बाळासाहेब ठाकरे उभे राहायचे. शिवसैनिक त्याचक्षणी उभे असायचे. बाळासाहेबांचा शब्द सुटला की प्रश्‍न मिटला म्हणून समजले जायचे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

chagan bhujbal news
Shiv Sena : 'छापखान्यातून गायब झालेले ८८ हजार कोटी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात वापरले?' राऊतांचा गंभीर आरोप

अभेद्य असलेली शिवसेना विस्कळीत व्हायला लागली. अशा गोष्टी राजकारणात चालत असतात. कुणी तत्व, तर कुणी निर्णय यातून शिवसेनेला सोडले. अजूनही शिवसेनेतून बाहेर पडण्याचा प्रवाह सुरु आहे.

मुळातच, उद्धव ठाकरे यांच्याकडे जूने नेते, अनुभवी शिवसैनिक आहेत. ते गळती थांबवू शकतात. सगळ्यांना एकत्र बसवून उद्धव ठाकरे निर्णय घेतील. पण, त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आणि जनतेवर विश्‍वास आहे. त्यामुळे ज्यांना जायचे आहे, त्यांना अडवायचे कशाला? असे कदाचित, त्यांना वाटत असेल, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

chagan bhujbal news
Shiv Sena : फक्त १८ जण हजर होते अन् बाळासाहेबांनी नारळ फोडला !.. अशी झाली होती शिवसेनेची स्थापना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com