Balasaheb Thackeray : अशी केली होती बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thackeray

Balasaheb Thackeray : अशी केली होती बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना!

मराठी अन् हिंदुत्वावर हुंकार काढणारी शिवसेना गेली तीन महिने अभूतपूर्व संकटातून जातीये. गेल्या काही महिन्यात शिवसेनेच्या इतिहासात कधीही घडल्या नसतील अशा घटना घडल्या आहेत. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली होती हे तुम्हाला माहिती आहेच. गेल्या साडेपाच दशकांमध्ये शिवसेनेने एक प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवला आहे. याच शिवसेनेची पायाभरणी कशी केली आणि शिवसेना हेच नाव का देण्यात आले, याबद्दल आज जाणून घेऊयात.

ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले.

हेही वाचा: Balasaheb Thackeray Jayanti: त्यावेळी बाळासाहेबांनी एकाच दणक्यात केलं बॉलीवूड गार .. पुढे सगळेच होते दबकून!

साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. मार्मिकमधील लेखणीने, मैदानी सभांमधील भाषणांनी आणि व्याख्यानांमुळे मुंबईतील मराठी भाषिक लोक बाळासाहेब ठाकरेंना भेटत होते. त्यांच्यापुढे व्यथा मांडत होते.

हेही वाचा: Balasaheb Thackeray : उद्धव ठाकरेंसाठी सेनेने बनवलेले खास पद, कोणी मांडलेला प्रस्ताव जाणून घ्या

बाळासाहेबांना नेतृत्व मानणारे सामान्य मराठी लोक त्याकाळात मातोश्रीवर गर्दी करत होते. लोकांचे प्रश्न समजून घेऊन आवाज उठवायला सुरूवात केली होती. त्याकाळात  ‘वाचा आणि थंड बसा’, हे बाळासाहेबांचं सदर प्रचंड गाजलं. यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांना वारंवार पक्षाबाबत, संघटनेबाबत काही विचार डोक्यात आहे का? असे विचारले. लोक येणार-जाणार असे किती दिवस चालणार? लोकांच्या आवाजाला एकत्रित संघटित रूप कधी देणार? असे प्रश्न विचारले.

हेही वाचा: Balasaheb Thackeray Jayanti: “बाळासाहेबांचं तैलचित्र पूर्ण होईपर्यंत...“, चित्रकार चंद्रकलांची पहिली प्रतिक्रिया

'समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच मुंबईत अपमानित होतो आहे.' हा विचार घेऊनच बाळासाहेबांनी १९६६ या मार्मिकच्या अंकात तरुणांची संघटना स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा: Balasaheb Thackeray यांच्या जयंतीदिनी Uddhav Thackeray शिवसेना सोडणार का?

जाहीर केले खरे पण त्याला नाव काय द्यायचे हा विचार सुरू असतानाच प्रबोधनकारांनी एक नाव सुचवले. प्रबोधनकार ब्राह्मण चळवळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जनतेच्या मनात असलेली आदराची भावना अनुभवली होती.त्यामूळेच त्यांनी स्वतःहून नाव सुचवलं शिवसेना. शिवसेना म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची सेना.

हेही वाचा: Balasaheb Thackrey : बाळासाहेबचं ते! नरेंद्र मोदींचा बाळासाहेब ठाकरेंना वाकून नमस्कार

बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांची गर्दी होऊ लागली. लोकांचा प्रतिसाद बघून ते सुखावले आणि त्यांनी १९ जून १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली.  बाळासाहेबांनी आपल्या घरातील लोकांच्या व निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने शिवसेना उद्घाटनाचा सोहळा पार पडला. यावेळी केवळ अठरा लोक हजर होते.

हेही वाचा: Shiv Sena Symbol Row : 'विजय आमचाच होईल, कारण…'; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

या सोहळ्याला ठाकरे कुटुंबीयातील चौघे स्वतः बाळ ठाकरे आणि त्यांचे दोन बंधू व प्रबोधनकार ठाकरे हजर होते. यावेळी नाईक नावाच्या एका कार्यकर्त्यांनी शेजारच्या किराणा मालाच्या दुकानातून नारळ आणला. सकाळी साडेनऊ वाजता प्रबोधनकारांच्या हस्ते नारळ फोडून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा देत शिवसेना स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली. 

हेही वाचा: Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्षपद सोडणार? निवडणूक आयोगाने...

मार्मिकमधून केलेल्या अवाहनाला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. मार्मिक कचेरीवर झालेल्या तुडुंब गर्दीत २००० तक्ते तासाभरात संपले आणि महिन्यात वीस हजार सैनिकांची नोंदणी झाली.

शिवसेना आता ५७ वर्षाची झाली आहे.  या काळात शिवसेनेने मराठी माणसासाठी दिलेला लढा सर्वांनी पाहिला आहे. लहान मुलांच्या तोंडातही शिवसेना हे नाव आपसुकच येतं. सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा एका शिवसैनिकाच्याच आहे. हि सुखद गोष्ट आहे.