ऐन पावसाळ्यात शिवशाहीची मनमानी; Reservation असूनही दीड ते दोन तासाचा उशीर

Shivshahi bus
Shivshahi busesakal

नाशिक : मुसळधार पावसाने नागरिक त्रस्त असतांना परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसचे वेळापत्रक कोलमटले आहे. पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांनी आगाउ आरक्षण करुनही दोन दोन तास बस येत नाही. इतर बसमध्ये प्रवाशांना घेतले जात नाही. त्यामुळे आगाउ पैसे भरुन दोन दोन तास प्रतिक्षा करण्याची प्रवाशांवर बेळ आली आहे. पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना आठवडाभरापासून मनस्ताप सोसावा लागत आहे. (Shivshahi delay during rainy season One half to two hours delay despite reservation Nashik Latest Marathi News)

नाशिक हून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रोज हजार ते बाराशे खासगी आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवाशी पुण्याचा प्रवास करतात. रस्ते मार्गे प्रवास करणे शक्य नसलेल्या अनेक रुग्णांचा नाशिक रोड कल्याण आणि कल्याण ते पुणे असा प्रवास सुरु असतो. ट्रव्हल्स व खासगी वाहन चालकांची संख्या मोठी आहे. नाशिकमधील हजारो विद्यार्थी पुण्यातील वेगवेगळ्या शिक्षण संस्थातून शिक्षण घेत आहे.

याशिवाय उद्योग व्यवसाय आणि नोकऱ्यासाठी नाशिकहून पुण्याला आठवड्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सहाजकिच, त्यातील बहुतांश प्रवाशांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवर अवलंबून रहावे लागते. परिवहन महामंडळाच्या वेळापत्रकानुसार, साधारण आर्ध्या ते पाउन तासाला पुण्याला जाण्यासाठी बसची सोय आहे. नाशिक पुणे शिवाय नाशिकमधील सटाणा, कळवण,भगूर, साक्रीपासून तर विविध स्थानकातून मोठ्या प्रमाणावर बस धावतात.

वेळापत्रक कागदावर

नियमित बसशिवाय शिवशाही बसही सुरु आहेत. त्यासाठी आगाउ आरक्षण घेतले जाते. मात्र नेमक्या शिवशाही बसच्या वेळापत्रकाचा मात्र गोंधळ उडाला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवाशी नाशिक पुणे प्रवसासाठी शिवशाही बसची आरक्षण करतात मात्र त्या बस कायमच उशीरा येतात. नियोजित वेळात शिवशाही बस येत नसल्याने प्रवाशांना हमखास मनस्ताप सोसावा लागतो.

Shivshahi bus
Crime Update : महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी संशयिताला अटक

रविवारी सुट्टीच्या दिवशी तर हमखास गैरसोय होते. असा पुण्याला शिक्षण घेणाऱ्या तसेच निवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा अनुभव आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मुलांना भेटायला जाउ इच्छिणाऱ्या पालकांसाठी रविवार हा सुट्टीचा नव्हे तर मनस्तापाचा वार झाला आहे. आज अनेक पालकांना शिवशाही बसअभावी असेच ताटकळत रहावे लागले.

नाशिक बसस्थानकातून शिवशाही बस नियमित न सुटल्याने प्रवाशांना दीड ते दोन तास तिटस्थ पावसात थांबावे लागले. अशापैकीच सकाळी अकराची नियोजित वेळ असूनही दुपारी एकपर्यत शिवशाही बसची प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांनी आज तक्रारी मांडल्या.

त्यांच्या मनस्तापाबाबत नाशिक रोड बसस्थानकातील व्यवस्थापकांशी संर्पक साधला पण नाशिकहून बस येत नसल्याने सांगत त्यांना वेळ मारुन नेण्याशिवाय पर्यायच नव्हता. प्रतिनिधीक स्वरुपात जेल रोड भागातील शशी अनवट यांनी प्रवाशांच्या या नियमित मनस्तापाबाबत तक्रार केली. आगाउ आरक्षणापोटी तिकीटीचे पैसे घेउन प्रवाशांना तिटस्थ ठेवण्याच्या वाढत्या प्रकाराची चौकशी करावी. अशी मागणी केली.

Shivshahi bus
Nashik : नारळाच्या झाडावर चक्क बिबट्यांची चढाई...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com