Gudhi Padwa : छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यासमोर गगनचुंबी गुढी उभारत सिन्नरला शोभा यात्रेची सुरुवात

Gudhi Padwa Festival
Gudhi Padwa Festivalesakal

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : हिंदू पंचांगप्रमाणे सुरू होणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिन्नर तालुका सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बुधवारी सकाळी गुढीपाडव्यास भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

या शोभायात्रेत पारंपरिक मराठमोळ्या वेषात सिन्नरकरांनी सहकुटुंब सामील होऊन नवीनवर्षाचे जल्लोषात स्वागत केले. नववर्ष स्वागताचे करण्यात आले. (Shobha Yatra by erecting 40 feet Gudhi in front of statue in Chhatrapati Shivaji Maharaj Chowk in sinnar on gudhi padwa nashik news)

टाळ मृदंगाचा निनाद व अभंगाच्या गजरात मिरवणुकीत मराठी व भारतीय संस्कृतीचा उद्घोष करण्यात आला. पारंपरिक वेषातील घोडेस्वार, गोंधळी मंडळ, तुताऱ्या, झेंडे, वाघ्या मुरली, मल्लखांब, गणेशाची पालखी, वासुदेव, बोहाड्यातील सोंगे, लेझीम पथक लक्ष वेधणारे ठरले.

सिन्नर सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाश नवसे, हेमंत वाजे, प्रा. राजाराम मुगसे, मनीष गुजराथी, पंकज भंडारी आदींनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. तसेच कार्यक्रमासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे, माजी नगरसेवक मनोज भगत, सिन्नर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील अनेक मान्यवरांनी या शोभयात्रेत भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला

नववर्ष दिनी बुधवारी (दि.२२) सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्यासमोर ४० फुट उंचीची गगनचुंबी गुढी विधिवत पूजन करून मान्यवरांच्या हस्ते उभारण्यात आली. यानंतर सांस्कृतिक स्वागत यात्रेचा शुभारंभ झाला. मिरवणुकीच्या आरंभी सजवलेली गणेश पालखी होती

Gudhi Padwa Festival
Nashik News : नाशिकमध्ये 132 वर्षात साकारलीत 20 मंदिरे! काळाराम मंदिरासाठी सर्वाधिक 23 लाखांचा खर्च

पारंपरिक पुणेरी ढोल-ताशांचा निनाद, घोड्यावर स्वार झालेले राष्ट्रपुरुष व विरांगणांच्या रूपातील तरुण-तरुणी, गणेशाची पालखी, लेझीम पथक, टिपरी, बुलेट रॅली, महाविद्यालयीन विद्यार्थिनींची नऊवारी साडीतील स्कुटी रॅली, तुतारी, वासुदेव, गोंधळी, भजनी मंडळ, संबळ-पिपाणी, मल्लखांब व दोरीवरील मल्लखांब (मुलीचे) अशा एक ना अनेक पारंपरिक वैशिष्ट्यांनी भरलेल्या या शोभा यात्रेत पारंपरिक मराठी वेश परिधान करून सर्व स्तरातील महिला-पुरुष सहभागी झाले.

विशेष करून सायकलिस्ट येथील पुरुष व महिला यांनी सायकल चालवून पर्यावरण पूरक संदेश शहरात दिला . तसेच अनेक सामाजिक संस्थेने वृक्ष लावा वृक्ष जगवा जल है तो कल है अशा विविध घोषणांनी सिन्नर शहरात रॅलीमध्ये भाग घेत आपला सहभाग नोंदवला

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन गणेशपेठ-भिकुसा कॉर्नर-शिंपी गल्ली- लालचौक- गंगावेस खडकपुरा जुनी नगरपालिका-महालक्ष्मी रोड-नाशिकवेस मार्गे नर्मदा लॉन्स येथे समारोप झाला. शोभायात्रेत सर्व सार्वजनिक व सामाजिक मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे सामील झाले होते.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Gudhi Padwa Festival
Prajakta Mali:'कित्येक वर्षांनी असा योग येतो..Happy Gudhi Padwa'

चौका- चौकात रांगोळ्या, पुष्पवृष्टी

शहरातील प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रेच्या स्वागतार्ह चौकाचौकात रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून यात्रेचे स्वागत केले जात होते . विविध मित्रमंडळ, समाजातील महिला व मित्रमंडळाचे सदस्य गटागटाने मिरवणुकीत सहभागी होते.

शोभायात्रातील समारोप मातोश्री नर्मदा लॉन्स येथे करण्यात आला यावेळी शोभायात्रा भाग घेतलेले महिला पुरुषवर्ग सामाजिक मंडळी विद्यालयातील विद्यार्थी विविध वेशभूषेतील पुरुष व महिला या सर्वांचे गुलाब पुष्प व पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे व सांस्कृतिक कला मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, भाजपचे प्रभारी तालुकाध्यक्ष जयंत आव्हाड तसेच भाजपचे भाऊसाहेब शिंदे सांस्कृतिक मंडळाचे राजाराम मुंगसे आदींच्या हस्ते शोभा यात्रेत भाग घेतलेल्या महिला व नागरिक तसेच विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.

Gudhi Padwa Festival
MUHS Election : आरोग्य विद्यापीठ अभ्यासमंडळाचा निकाल जाहीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com