VIDEO : नाशिकच्या बिटको रुग्णालयात शॉर्टसर्किट; सुदैवाने जीवितहानी नाही

नवीन बिटको कोविड सेंटरमध्ये अचानक संध्याकाळी सात वाजता शॉर्टसर्किट झाल्याने एकच खळबळ उडाली.
ventilator
ventilatorSakal
Updated on

नाशिक रोड : येथील मनपाच्या डॉ झाकिर हुसेन रुग्णलयात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेला काही दिवस झाले असतानाच आज नवीन बिटको (Bytco Hospital) कोविड सेंटरमध्ये अचानक संध्याकाळी सात वाजता शॉर्टसर्किट झाल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वैद्यकीय अधिक्षक बापुसाहेब नागरगोजे यांनी माहिती दिली. (short circuit in ventilator at corporation bytco hospital in nashik)

बिटको कोविड सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या व्हेंटिलेटर कक्षामध्ये एकूण सोळा वेंटिलेटर असून त्यावर अनेक रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यापैकी एका व्हेंटिलेटरच्या कॉम्प्रेसरमधून शॉर्टसर्किट झाल्याने धूर बाहेर पडत होता तसेच इतर 3 व्हेंटिलेटर मशीन काही काळाकरिता बंद पडले. मात्र ही बाब कर्तव्यावर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही यंत्रणा पुन्हा एकदा कार्यान्वित केली आणि सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, व्हेंटिलेटरवर असलेले सर्व रुग्णांची स्थिती स्थिर आहे अशी माहिती बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली.

ventilator
तौक्ते चक्रीवादळाचा द्राक्षवेलींना फटका; कोवळ्या फांद्या तुटल्या, शेतकरी चिंतेत

बिटको हॉस्पिटल मध्ये शॉर्टसर्किट झाल्याच्या घटनेची माहिती समजताच रुग्णालयात नातेवाईकांनी चौकशीसाठी गर्दी केली होती. घटना समजताच महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोविड सेंटर प्रमुख डॉ. अवेश पलोड, डॉ जितेंद्र धनेश्वर आदींसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अतिदक्षता विभागाकडे धाव घेतली. याबद्दलची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. दरम्यान, रुग्णालयाच्या बाहेर पेशंट दगावल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.

(short circuit in ventilator corporation bytco hospital in nashik)

ventilator
नाशिकला ५ लाख लसींची गरज; मुंबई, ठाणे महापालिकांकडे करणार मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmhouse Hideout Ends in Arrest Nashik Police Tighten Probe Into Rs 160 Crore Shalarth Scam Case
Dilip Gavit inspirational success story
Dilip Mahadu Gavit wins gold in Commonwealth Games
Sanjay Garud Arrest Latest News
Marathi News Esakal
www.esakal.com