esakal | लसीने पळविले तोंडचे पाणी! तुटवडा,वणवण अन् मारामार
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

लसीने पळविले तोंडचे पाणी! तुटवडा,वणवण अन् मारामार

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : ऑक्सिजन, (oxygen) रेडमेसिव्हिर इंजेक्श‍नच्या (remdesivir injection) तुटवड्यानंतर शहरात लशींचा तुटवड्याने (vaccine shortage) शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. शहरातील सर्वच केंद्रावर बिकट परिस्थिती आहे. कुठे पाचपासून रांगा, तर कुठे लसच मिळत नसल्याने नागरिकांचा संताप बघायला मिळत आहे. (shortage of vaccine nashik marathi news)

हेही वाचा: शिवसेना व्यापारी सेनेच्या जिल्हाध्यक्षांची आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

कुठे तुटवडा, तर कुठे लसीसाठी वणवण, मारामार

कोरोनापासून सुरक्षाकवच मिळण्याचा लस हाच उतारा आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करूनही रोज नंबर लागत नसल्याची ओरड आहे. तीन-चार दिवसांपासून काही नागरिकांना रोज चकरा माराव्या लागत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीस लसीकरण सुरू केले असल्याने लसीकरणासाठी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड लशींचा तुटवडा भासत आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन महिना पूर्ण झाल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात फरफट होत असल्याचे चित्र आहे.