esakal | शिवसेना व्यापारी सेनेच्या जिल्हाध्यक्षांची आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

umesh naik

शिवसेना व्यापारी सेनेच्या जिल्हाध्यक्षांची आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि.नाशिक) : शिवसेना (shivsena) अंगीकृत व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्षांनी (District President) गळफास घेत आत्महत्या (suicide) केली. घटना समजताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली.( District President suicide of Shiv Sena Vyapari Sena)

हेही वाचा: लसीकरण केंद्रावर स्थानिक-बाहेरच्यांमध्ये वाद; पोलिस बंदोबस्ताची मागणी

घरी गळफास लावलेल्या अवस्थेत

शिवसेना अंगीकृत व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश काशीनाथ नाईक (वय ३६) यांनी स्वतःच्या जुन्या घरात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. नाईक हे पत्नी, मुलगा व दोन मुलींसह काळाराम मंदिर परिसरातील निर्मल उपवन सोसायटीत वास्तव्यास आहेत. शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेदहाच्या सुमारास ते सीतागुफा रोडवर, जोशी वाडा येथील जुन्या घरी कलर द्यावयाचा आहे, ते जाऊन बघतो, असे सांगून घराबाहेर पडले. जेवणाची वेळ झाली तरी ते परत न आल्याने त्यांच्या पत्नीने मोबाईलवर संपर्क साधला. मात्र ते मोबाईल घरीच ठेवून गेले होते. त्यांच्या मित्रांना संपर्क साधला असता, त्यांनाही काही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या पत्नीने जुन्या घरी धाव घेतली. त्या वेळी घराचा दरवाजा आतून लावलेला होता. परिसरातील नागरिक व नातेवाइकांनी दरवाजा तोडला असता उमेश नाईक हे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर पंचवटी पोलिसांना कळविण्यात आले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा: नाशिकच्या नाट्यविश्वाचा हिरा हरपला! दिग्दर्शक-अभिनेता प्रशांत हिरे काळाच्या पडद्याआड