पोलिस आयुक्त दीपक पांडेंना कारणे दाखवा नोटीस? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CP Deepak Pandey

पोलिस आयुक्त दीपक पांडेंना कारणे दाखवा नोटीस?

नाशिक : महसूल विभागातील अधिकारी व त्यांचे अधिकार हे आरडीएक्स डिटोनेटर असल्याचे म्हणारे शहर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना गृहविभागाने कारणे दाखवा नोटीस बजाविल्याची बोलले जात आहे. मुंबईत आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतही पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या पत्रावर चर्चा होवून नाराजी व्यक्त करण्यात आली. आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना नोटीस बजाविली असल्याची चर्चा मात्र संपूर्ण शहरात होती.

महसूल विभागातील अधिकारी (Revenue Department Officers) व त्यांचे अधिकार हे आरडीएक्स डिटोनेटर असल्याने त्यांचे अधिकारी काढून घेण्यात यावे असे पत्र पोलिस आयुक्त दीपक पांडे (CP Deepak Pandey) यांनी पोलिस महासंचालक व वरिष्ठ अधिकारी यांना दिलेल्या पत्रात केले होते. त्यानंतर हे पत्र समाजमाध्यामांवर प्रसारित होताच याच पडसाद उमटालयला लागले.

हेही वाचा: ‘ते’ पत्र व्‍हायरल झाले कुठून? विशेष शाखेकडे तपास

नाशिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पत्रावर नाराजी व्यक्त करत १० एप्रिल पर्यंत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सर्वांची बिनशर्त माफी मागावी व त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे सचिवांना केली. तसेच रितसर निवेदन देखील विभागातील अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले.

हेही वाचा: नाशिक पोलिस आयुक्तांचा लेटर बाॅम्ब; म्हणाले, "महसूल अधिकारी म्हणजे..."

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी देखील आयुक्त पांडे यांच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिस आयुक्त पांडे यांनी महसूलमंत्री यांची माफी मागितली. मात्र आपण आपल्या पत्रावर ठाम असल्याचे सांगितले. आज (ता.७) मंत्रीमंडळ बैठकीत दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Show Cause Notice To Commissioner Of Police Deepak Pandey Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..