Kumbh Mela
sakal
पिंपळगाव बसवंत: सिंहस्थ कुंभमेळ्याची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राज्यस्थान येथून येणाऱ्या भाविकांच्या पार्किंगची सोय व अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था पिंपळगाव बसवंत शहरात करण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून पिंपळगाव बसवंत शहरातील मंगल कार्यालये, मोकळे भूखंडा यांची माहिती पोलिस ठाण्याकडून मागविण्यात आलेली आहे. तसे झाल्यास नाशिकच्या कुंभमेळ्यातील नियोजनात पिंपळगावकरांचा हातभार लागणार आहे.